प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची सर्वत्र चर्चा आहे. या कुंभमेळ्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेक सेलिब्रिटीही कुंभमेळ्यात हजेरी लावत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काही मराठी सेलिब्रिटीही कुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत. आता दाक्षिणात्य अभिनेत्यानेही कुंभमेळ्यात आईसह हजेरी लावली आहे.
साऊथ स्टार विजय देवराकोंडा आईला घेऊन प्रयागराजला गेला आहे. महाकुंभमेळ्यात विजय देवराकोंडाने आईसह त्रिवेणी संगम येथे गंगेत डुबकी मारत स्नान केलं. यावेळी पारंपरिक वेशात विजय दिसून आला. त्याने भगव्या रंगाची लुंगी नेसली होती. तर गळ्यात रुद्राक्षच्या माळा घातल्याचं दिसत आहे. एका X अकाऊंटवरुन विजय देवराकोंडाचा महाकुंभमेळ्यातील हा फोटो ट्वीट करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांमुळे ट्राफिक जाम झालं आहे.वाराणसी, लखनऊ, कानपूर ते प्रयागराज जाणाऱ्या रस्त्यांवर २५ किलोमीटरपर्यंत जाम आहे. दुसरीकडे, प्रयागराज संगम रेल्वे स्थानकाबाहेर जास्त गर्दी असल्याने स्टेशन बंद करण्यात आले आहे. आज प्रयागराजकडे जाणे अशक्य आहे, कारण २००-३०० किलोमीटर वाहतूक कोंडी आहे," असे पीटीआयच्या वृत्तात पोलिसांनी सांगितले आहे.