बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा ‘जंगली’ हा अॅक्शन सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून विद्युतला बऱ्याच अपेक्षा होत्या. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. अर्थात याऊपरही विद्युतच्या लोकप्रियतेवर कुठलाही नकारात्मक परिणाम झालेला नाही. ताज्या बातमीनुसार, ‘जंगली’नंतर विद्युतच्या झोळीत पुन्हा एक अॅक्शन सिनेमा पडला आहे. होय, दिग्दर्शक फारूख कबीर यांच्या चित्रपटात विद्युतची वर्णी लागली आहे. हा चित्रपट कुमार मंगत आणि अभिषेक पाठक प्रोड्यूस करताहेत.
आणखी एका अॅक्शन थ्रीलर चित्रपटात विद्युत जामवालची एन्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 14:15 IST
‘जंगली’नंतर विद्युतच्या झोळीत पुन्हा एक अॅक्शन सिनेमा पडला आहे. होय, दिग्दर्शक फारूख कबीर यांच्या चित्रपटात विद्युतची वर्णी लागली आहे.
आणखी एका अॅक्शन थ्रीलर चित्रपटात विद्युत जामवालची एन्ट्री!!
ठळक मुद्दे‘खुदा हाफिज’ या चित्रपटासोबतच विद्युतचा ‘कमांडो 3’ हा सिनेमाही येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.