Join us

विद्या बालनच्या 'शेरनी'चे नवीन पोस्टर रिलीज, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 15:09 IST

विद्या बालनचा शेरनी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विद्या बालनचा आगामी चित्रपट शेरनीचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आता न्यूटन फेम अमित मसुरकर दिग्दर्शित विद्या बालनच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करुन निर्मात्यांनी आज या चित्रपटाच्या उत्साहाला उत्तेजन दिले आहे.  

शेरनीच्या नव्या पोस्टरमध्ये विद्या बालन वन अधिकारीच्या  भूमिकेमध्ये आपल्या  सहकाऱ्यांसह जंगलाची पाहणी करताना दिसत आहे, विद्या आपल्या अष्टपैलू अभिनयातून तिच्या प्रत्येक पात्रात जीव ओतते हे तर जाहिरच आहे आणि आता तिचा लूक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

याबद्दल अभिनेत्री विद्या बालन म्हणाली की, “जेव्हा मी प्रथम शेरनी ची कहाणी ऐकली तेव्हापासून मला जग मोहक आणि अधिक सुंदर वाटू लागले आहे. तसेच मी ज्या भूमिकेत आहे, त्यात विद्या ही कमी शब्दांची पण अनेक आयामांची स्त्री आहे. हा चित्रपट एका संवेदनशील विषयावर आधारित आहे जो केवळ मनुष्य-प्राणी यांच्यातच नव्हे तर मानवांमध्येदेखील आदर, परस्पर समन्वय आणि सह-अस्तित्वाच्या विषयाला स्पर्श करतो. अमेझॉन प्राइम व्हिडिओद्वारे हे अनोखे पात्र आणि कथा जागतिक प्रेक्षकांसमोर येणार आहे याचा मला आनंद होत आहे आणि ते यात मत्रमुग्ध होतील अशी आशा करते. ”

 टी-सीरिज आणि अबंडनशीया एण्टरटेन्मेंट, भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि अमित मसूरकर निर्मित, विद्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट शेरनी १८ जूनला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

टॅग्स :विद्या बालन