Join us
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षीय विद्या बालनचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, व्हिडिओ पाहून चाहते अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 11:18 IST

एका इव्हेंटमधील विद्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत विद्याने वजन घटवल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते अवाक् झाले आहेत.

विद्या बालन ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारलेल्या विद्याने बॉलिवूडमध्ये कोणताही गॉड फादर नसताना जम बसवला. सुडौल आणि स्लिम ट्रीम फिगर ही अभिनेत्रीची चौकट मोडत तिने बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर करून दाखवलं. आता विद्याने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केल्याचं पाहायला मिळत आहे. 

एका इव्हेंटमधील विद्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विद्या बालनने नुकतंच एका इव्हेंटला हजेरी लावली होती. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन तिचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या इव्हेंटसाठी विद्याने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करत ग्लॅमरस लूक केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओत विद्याने वजन घटवल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते अवाक् झाले आहेत. विद्या बालनचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत. 

विद्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. "आता ती १० वर्ष तरूण दिसत आहे", "ही तर स्लिम आणि तरूण दिसत आहे", "वेल डन विद्या", "खूप सुंदर दिसत आहे", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. विद्याचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अभिनेता अंगद बेदीही थक्क झाल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

'हम पांच' या मालिकेतून विद्याने अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. २००५ साली 'परिणीता' या हिंदी सिनेमात विद्याची वर्णी लागली. त्यानंतर विद्याने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. 'लगे रहो मुन्नाभाई', 'भुल भुलैय्या', 'पा', 'कहानी', 'तुम्हारी सुलू', 'हे बेबी', 'मिशन मंगल', 'बेगम जान', 'द डर्टी पिक्चर' या सिनेमांत ती दमदार भूमिका साकारताना दिसली. आता भुल भुलैय्या ३मध्ये विद्या दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. 

टॅग्स :विद्या बालनसेलिब्रिटी