Join us

विद्या बालनचा फेक AI व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्री भडकली, म्हणाली- "माझा याच्याशी काहीही संबंध..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 17:44 IST

अभिनेत्रीचा फेक AI व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत विद्या बालनने तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत चाहत्यांना अलर्ट केलं आहे.

सध्या डीपफेक व्हिडिओचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही दिवसांत रश्मिका मंदाना, कतरिना कैफ, आलिया भट यांचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनही याची शिकार झाली आहे. अभिनेत्रीचा फेक AI व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत विद्या बालनने तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत चाहत्यांना अलर्ट केलं आहे.

विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिचा AI जनरेटेड फेक व्हिडिओ शेअर केला आहे. 'स्कॅम अलर्ट' असं म्हणत तिने चाहत्यांना सावध केलं आहे. या व्हिडिओमध्ये बोलणारी व्यक्ती विद्या बालनच असल्याचं जाणवत आहे. पण, हा व्हिडिओ अभिनेत्रीचा नाही. "सोशल मिडिया आणि व्हॉट्सअॅपवर सध्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मी दिसत आहे. मला हे स्पष्ट करायचं आहे की ते व्हिडिओ AI जनरेटेड असून खोटे आहेत", असं विद्याने म्हटलं आहे. 

पुढे ती म्हणते, "हे व्हिडिओ बनवण्यात किंवा त्याचं प्रमोशन करण्यात माझा कोणताही सहभाग नाही. या व्हिडिओत जो दावा केला आहे, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी सगळ्यांना विनंती करते की अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा माहिती शेअर करण्यापूर्वी ती एकदा तपासून पाहा. आणि अशाप्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या AI जनरेटेड कंटेटपासून सावध राहा". 

विद्या बालनचा हा फेक AI व्हिडिओ पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान, विद्या बालन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'भूल भूलैया ३'मध्ये ती दिसली होती. विद्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

टॅग्स :विद्या बालनसेलिब्रिटी