Join us

VIDEO : शाहरुखनं पापाराझींना टाळलं, अंबानींच्या पार्टीत गौरीसोबत स्पॉट झाला आर्यन खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 02:33 IST

यावेळी, शाहरुखने पठानी कुर्ता-पायजमा परिधान केला होता. गौरी खान क्रिम कलरच्या बेसवर पावडर ब्लू आणि सिल्व्हर सुरोस्की लहंग्यात दिसून आली.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी आणि त्याची गर्लफ्रेंड राधिका मर्चेंट यांचा आज अँटीलियामध्ये साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती. पार्टीत बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यनसोबत आला होता. यावेळी एकिकडे गौरी खान आणि आर्यन पापाराझींसमोर पोज देताना दसितले, तर दुसरीकडे, शाहरुख खान कॅमेऱ्यापासून अंतर ठेवताना दिसला.

पठाणी कुर्ता आणि पायजाम्यात दिसला शाहरुख -यावेळी, शाहरुखने पठानी कुर्ता-पायजमा परिधान केला होता. गौरी खान क्रिम कलरच्या बेसवर पावडर ब्लू आणि सिल्व्हर सुरोस्की लहंग्यात दिसून आली. तर आर्यन खान ब्लॅक शर्ट आणि पँटवर दिसून आला.

या बड्या सेलेब्सनीही लावली हजेरी -अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या साखरपुड्याला शाहरुख, गौरी आणि आर्यन शिवाय, सारा अली खान, ऐश्वर्या राय बच्चन, कॅटरीना कैफ, करण जोहर, अक्षय कुमार आणि वरूण धवन सारखे अनेक कलाकार आले होते.

लवकरच येतोय ‘पठान’ -शाहरुख खान ‘पठान’ चित्रपटाच्या माध्यमाने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रसिद्ध होत आहे. या चित्रपटात शाहरुख सोबतच दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानगौरी खानआर्यन खानमुकेश अंबानी