Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ‘तिच्या’ अचानक गायब होण्याने ऐश्वर्या राय बच्चन गोंधळली अन् मग संतापली... !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 19:14 IST

रिलीज आधी ‘फन्ने खां’च्या स्टारकास्टने जोरदार प्रमोशन केले होते. यादरम्यान ऐश्वर्या राय फार कमी ठिकाणी दिसली. पण जिथेही ती प्रमोशनसाठी गेली तिथे तिची उपस्थिती लक्षणीय ठरली. 

अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा ‘फन्ने खां’ हा चित्रपट आज रिलीज झाला. रिलीज आधी ‘फन्ने खां’च्या स्टारकास्टने जोरदार प्रमोशन केले होते. यादरम्यान ऐश्वर्या राय फार कमी ठिकाणी दिसली. पण जिथेही ती प्रमोशनसाठी गेली तिथे तिची उपस्थिती लक्षणीय ठरली.  एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये ऐश्वर्याचा संताप अनावर झालेला दिसला. होय, या इव्हेंटचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. 

हा व्हिडिओ जरा काळजीपूर्वक बघितला तर ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा राग तुम्ही सहज पाहू शकाल. यात ऐश्वर्याच्या चेह-यावर संताप स्पष्ट दिसतोय. व्हिडिओत एक महिला ऐश्वर्यांला रस्ता दाखवताना दिसते आणि धीस वे... म्हणून अचानक गायब होते. तिच्या अशा गायब होण्याने ऐश्वर्या काही क्षण गोंधळते आणि मीडियाच्या गर्दीत एकटी पडते. नेमकं कुठे जायचे, हेच तिला कळत नाही. मग काय, तिचा पारा चढतो़ तिचे संतापाने पुटपुटणे तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकू शकता.

फन्ने खां’च्या माध्यमातून अनिल कपूर व ऐश्वर्याची जोडी तब्बल १७ वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर एकत्र आलीय. राजकुमार राव हाही या महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फन्ने खां’ हा चित्रपट एक म्युझिकल कॉमेडी आहे. बाप-लेकीच्या कथेवर आधारित असलेला हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. 

 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनफन्ने खां