Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: माकडांसोबत इंग्रजीत गप्पा मारताना दिसली ही अभिनेत्री, सोशल मीडियावर झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 06:00 IST

माकडांसोबत इंग्रजीत गप्पा मारतानाचा या अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

२००८ साली १९२० या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अदा शर्मा सध्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अदा शर्मा सध्या ऋषिकेशमध्ये आहे आणि तिथले ती व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आता अदाचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत अदा माकडांच्या जवळ उभी असून त्यांच्यासोबत ती इंग्रजीत बोलत आहे. 

अदाने माकडांसोबतचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, मला लोकांनी सांगितलं की, ही जंगली माकडं आहेत, त्यांच्याशी अजिबात बोलण्याचा प्रयत्न करू नको. मला हेही सांगितलं आहे की, मी काही खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तर माझे डोळ्यांना इजा करतील. जर कुणी त्यांचे हे म्हणणे ऐकले तर ही माकडं उपाशी राहतील.

अदा शर्माने पुढे लिहिले की, ही माकडं इंडस्ट्रीतल्या काही लोकांच्या तुलनेत जास्त चांगले वागत होते. ऋषिकेशमधील प्राण्यांसोबत इंग्रजीत व पॅरिसमधील प्राण्यांसोबत हिंदीत अवश्य बोला.

अदा शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. एका युजरनं म्हटलं की, माकडांना हिंदी येते का? ते इंग्रजी काय समजणार आहेत. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, खूप हिंमत आहे. तुला भीती वाटत नाही का?

अदा शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती शेवटची कमांडो ३ चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत अभिनेता विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत होता.

टॅग्स :अदा शर्माकमांडो ३विद्युत जामवाल