पडद्यावर भूमिका जिवंत करताना बॉलिवूड कलाकारांना अनेक दिव्यातून जावे लागते. हिरो असो वा हिरोईन वजनाचा काटा जराही पुढे सरकू नये, यासाठी कडक डाएट फॉलो करावे लागते. आवडत्या खाद्यपदार्थांवर पाणी सोडावे लागते. केवळ इतकेच नाही अनेक तास जिममध्ये घाम गाळावा लागतो. पण ‘उरी’स्टारविकी कौशल हा मात्र याला अपवाद म्हणायला हवा. होय, विकीला यापैकी काहीही करावे लागत नाही. याचे कारण म्हणजे, त्याला असलेला एक ‘सुंदर’ आजार. होय, खुद्द विकीने एका मुलाखतीत हा खुलासा केला. मला वजन न वाढण्याचा ‘सुंदर’ आजार असल्याचे त्याने सांगितले.
ऐकलंत का, विकी कौशलला आहे हा ‘सुंदर’ आजार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 12:33 IST
स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी बॉलिवूड स्टार्सला अनेक दिव्यातून जावे लागते. पण विकी कौशलला मात्र काहीही करावे लागत नाही. याचे कारण म्हणजे, त्याला असलेला एक ‘सुंदर’ आजार.
ऐकलंत का, विकी कौशलला आहे हा ‘सुंदर’ आजार!!
ठळक मुद्दे‘उरी’मधील अॅक्शन सीन्स कठीण होते. सगळे लाईव्ह शॉट्स होते. अनेक गोष्टी रिअल होत्या. पण हे सगळे करताना मज्जा आली. मेजरची भूमिका साकारणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती, असेही त्याने सांगितले.