Join us

SO SWEET!! तिनं बॉक्स उघडला आणि...; विकी कौशलनं कतरिना कैफला कसं केलं प्रपोज?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 16:50 IST

how vicky kaushal proposed katrina kaif : विकीचं ‘स्वीट’ प्रपोजल, कतरिनाही नाही म्हणू शकली नाही...

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ही चर्चा खरी मानाल तर 9 व 10 डिसेंबरला विकी व कॅट दोघंही राजस्थानातील एका अलिशान किल्ल्यात लग्नगाठ बांधणार आहेत. या ग्रँड वेडिंगची तयारी जोरात सुरू असल्याचंही कळतंय. विकी व कॅट दोघंही लग्नाच्या या चर्चेवर काहीही बोलायला तयार नाही. पण चर्चा जोरात आहेत.अशात विकीनं कॅटला लग्नासाठी कसं प्रपोज केलं असावं, असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात असावा. तर आता त्याचाही खुलासा झालाय. होय, विकीनं कॅटची सर्वात आवडती वस्तू देऊन तिला प्रपोज केलं. ही वस्तू काय तर डार्क चॉकलेट ब्राउनी.

‘इंडिया टुडे’ने विकी व कॅटच्या एका जवळच्या मित्राच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, कॅटला डार्क चॉकलेट ब्राउनी प्रचंड आवडते. विकीनं त्याचा एक बॉक्स देऊन कॅटला प्रपोज केला. कतरिनाच्या आवडत्या बेकरीमधून काही डार्क चॉकलेट ब्राउनी घेऊन विकी थेट तिच्या घरी पोहोचला. कॅटने बॉक्स उघडला आणि त्यात अंगठी आणि एक चिठ्ठी होती. माझ्याशी लग्न करणार काय? असं त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं. विकीचा हा रोमॅन्टिक अंदाज कॅटला भावला आणि तिनं लगेच लग्नासाठी होकार दिला.

विकीआधी कतरिना रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्यातून सावरायला तिला बराच वेळ लागला. याचदरम्यान लॉकडाऊनमध्ये विकी व कतरिना एकमेकांच्या जवळ आलेत. आता तर हे नातं लग्नापर्यंत पोहोचल्याचं कळतंय.रिपोर्टनुसार राजस्थानमधील रणथंम्भोर राष्ट्रीय अभयारण्यापासून 30किलोमीटर दूर असलेल्या एका प्राचीन किल्ल्यात दोघं लग्न करणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लग्नाच्या विधी सुरू होतील, असंही मानलं जातंय.

होणा-या सासूबाईंनी दिलं खास गिफ्टबॉलिवूड लाईफनं दिलेल्या वृत्तानुसार, विकीच्या आईने कतरिनाला दिवाळीनिमित्त खास गिफ्ट हँपर पाठलं. यात विकीच्या आईनं स्वत:च्या हातांनी बनवलेली डार्क चॉकलेट्स, भारतीय मिठाई, काही साड्या आणि त्यावरची मॅचिंग ज्वेलरी असं सगळं होतं.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल