Join us  

सिनेमाचं शुटींग सुरु असतानाच विकी कौशलला पोलिसांनी पकडलं, दोनदा खाल्लीय तुरुंगाची हवा, नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 5:03 PM

विकीने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)  याचे नाव बॉलिडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत सामाविष्ट आहे.  विकी कौशल आज 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. विकीने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कमी वेळात विकीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.  एकाहून एक सरस सिनेमे त्याने दिले आहेत.  आज विकी हा यशाच्या शिखरावर आहे. पण, तुम्हाला माहितेय एकदा  विकी कौशलला पोलिसांनी पकडलं होतं आणि त्याला तरुंगाची हवा खावी लागली होती. 

 विकी कौशलने तुरुंगाची हवा खाल्ली आहे, ही माहिती फिल्ममेकर अनुराग कश्यपने कपिल शर्माच्या शोमध्ये दिली होती.  2012 मध्ये आलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा प्रकार घडला होता. या चित्रपटात विकी कौशल हा अनुराग कश्यपला असिस्ट करत होता. यात मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हुमा कुरेशी यांच्या भूमिका होत्या.

अनुराग कश्यपने सांगितले की, 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या वेळी परवानगी न घेता एका लोकेशनवर शूटिंग सुरू होतं.  तेव्हा शूटिंग करत असताना आम्हाला कळले की हे अवैध वाळू उत्खनन ठिकाण आहे. माफिया तेथे वाळू उत्खनन करत होते आणि त्याचवेळी पोलिस आले आणि विक्कीलाही अटक करण्यात आली'. यासोबत एकदा नाहीतर विकी दोनदा तुरुंगात गेल्याचे अनुरागने सांगितलं. 

विकी कौशल हा एक चांगला अभिनेता आहे. तो त्याचं प्रोफेशनल आयुष्य आणि वैयक्तिक जीवन यांच्यात योग्य संतुलन राखतो. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत संजय लीला भन्साळीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार आहे. त्याने करिअरच्या सुरुवातीला त्याने 'मसान' सिनेमा केला होता, त्यातला त्याचा साधेपणा लोकांना खूप आवडला होता. यानंतर विकीने 'राझी', 'उरी', 'मनमर्जियां', 'जरा हटके जरा बचके', 'संजू', 'सरदार उद्यम सिंग' आणि 'सॅम बहादूर' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा दाखवली.

टॅग्स :विकी कौशलसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमापोलिसअनुराग कश्यप