Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 10:10 IST

अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन 'फौजी २'च्या इव्हेंटमध्ये आले होते.

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि पती विकी जैन (Vicky Jain) ही जोडी 'बिग बॉस १७'मध्ये सहभागी झाली होती. तिथेही दोघांची भांडणं, अंकिताचं वागणं पाहून अनेकांनी डोक्याला हातच लावला होता. मात्र त्यांच्यातलं प्रेम कमी झालं नाही. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर त्यांना आणखी प्रसिद्धी मिळाली. नुकतंच विकी आणि अंकिता एका इव्हेंटमध्ये पोहोचले. तिथे विकी दुसऱ्याच अभिनेत्रीचा हात धरुन उभा होता. यानंतर अंकिताची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी झाली होती. 

अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन 'फौजी २'च्या इव्हेंटमध्ये आले होते. यावेळी मनोज वाजपेयी, गौहर खान, मीरा चोप्रा देखील होते. व्हिडिओमध्ये विकी मीराचा हात पकडून तिच्याशी काहीतरी बोलताना दिसतोय. नंतर तो अंकिताच्या बाजूला जातो तेव्हा अंकिता त्याला 'काय?' असं इशारा करते. विकी तिला काहीतरी उत्तर देतो. मात्र ती रागारागानेच मीराकडे पाहते. अंकिता आणि विकीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. 'अंकिता म्हणत असेल, घरी चल मग दाखवते','विकीने का हात धरलाय?','विकी पत्नीचा सोडून बाकी प्रत्येक अभिनेत्रीसोबत फ्रेंडली होतो','अंकिताबद्दल वाईट वाटतंय, तिला काय हवं होतं आणि काय मिळालंय','विकी मीराला काहीतरी गंभीर सांगत आहे, पण अंकिता ही अंकिता आहे ती तशीच वागणार.

टॅग्स :अंकिता लोखंडेसोशल मीडियाटिव्ही कलाकार