Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डान्स + 4'मध्ये येणार दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 19:42 IST

'डान्स + 4' या कार्यक्रमाचा चाहता असलेला भारताचा माजी कर्णधार व नामवंत क्रिकेटपटू कपिल देव लवकरच या कार्यक्रमात अतिथी परीक्षक म्हणून सहभागी होणार आहे.

ठळक मुद्दे कपिल देव 'डान्स + 4' कार्यक्रमाचा मोठा चाहता

'डान्स + 4' या कार्यक्रमाचा चाहता असलेला भारताचा माजी कर्णधार व नामवंत क्रिकेटपटू कपिल देव लवकरच या कार्यक्रमात अतिथी परीक्षक म्हणून सहभागी होणार आहे. निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले की कपिल देव हा नामवंत क्रिकेट खेळाडू हा 'डान्स + 4' कार्यक्रमाचा मोठा चाहता आहे. 

फील क्य्रू ही स्पर्धक टीम त्याची अतिशय आवडती असून या टीमचे बलात्कारविरोधी नृत्य विशेष लोकप्रिय झाले होते. कार्यक्रमाचा सुपरजज्ज रेमो डिसुझा याच्याशी कपिल देवचे जवळचे संबंध असून या कार्यक्रमात येणाऱ्या सर्व गुणी कलाकारांची त्याने वेळोवेळी प्रशंसा केली आहे. भारताचा हा नामवंत माजी क्रिकेट कर्णधार या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याच्या वृत्ताला रेमोने दुजोरा दिला असून त्याबद्दल आपले मतही त्याने व्यक्त केले आहे. रेमो म्हणाला, 'या कार्यक्रमात जे अप्रतिम गुणवान स्पर्धक येतात, त्यांच्या कामगिरीचे कपिल देव यांनी वेळोवेळी कौतुक केले आहे. आता ते या कार्यक्रमात सहभागी होत असून त्याबद्दल मी खूपच उत्सुक झालो आहे. या गुणवान स्पर्धकांची कामगिरी आता त्यांना प्रत्यक्ष पाहता येईल. कपिल देव यांच्यासारखी व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होत आहे, ही आमच्या दृष्टीने एक सन्मानाचीच बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांची आतुरतेने वाट पाहात आहोत.'

टॅग्स :डान्स प्लस 4कपिल देव