Join us

Vikram Gokhale : एकेकाळी विक्रम गोखले अन् त्यांच्या वडिलांनी गाजवला होता रंगमंच; आजी- आजोबांकडून मिळाला कलेचा वारसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 15:33 IST

Vikram Gokhale विक्रम गोखले यांचं संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीत कार्यरत होत. त्यांनी एकेकाळी वडिलांसोबत रंगमंच गाजवला होता.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्राणज्योत आज मालवली आहे. पुण्यातील मंगेशकर रुण्यालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ७७ वर्षांचे होतं. मराठी आणि हिंदी चित्रपटतसृष्टीत आपल्या अभिनयचा ठसा उमटवणाऱ्या विक्रम गोखले यांनी घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. जाणून घेऊया त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास 

विक्रम गोखले यांच्या वडिलांपासून ते आजी आजोबापर्यंत संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीत कार्यरत होत. विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या.  तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले पुर्वीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. १९१३ मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७१ हून जास्त हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या.

वडील मुलानं केलं एकाच नाटकात काम  बॅरिस्टर या नाटकात विक्रम गोखले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी एकत्र काम केले होते. मानवी नातेसंबंधांची अनोखी बाजू या नाटकाने मांडली. विक्रम गोखले यांना बॅरिस्टर या नाटकाने खरी ओळख मिळून दिली.  मानवी नातेसंबंधांची अनोखी बाजू या नाटकात मांडण्यात आली होती.  दुसरा सामना,सरगम, स्वामी अशा अनेक नाटकात त्यांनी काम केले होते. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय संन्यास घेतला होता.

अग्निहोत्री मालिकेत विक्रम गोखलेंनी मोरेश्वर गोखलेंचे पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. विक्रम गोखले यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात तो ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होते. याशिवाय ते 'भूल भुलैया', 'दिल से', 'दे दना दान', 'हिचकी', 'निकम्मा', 'अग्निपथ', 'मिशन मंगल' या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. भिंगरी, माहेरची साडी, लपंडाव, वासुदेव बळवंत फडके, सिद्धान्त हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला गोदावरी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. 

टॅग्स :विक्रम गोखलेमृत्यू