Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ved Marathi Movie : रितेश जेनेलियाचं संगीत क्षेत्रात पाऊल, 'देश म्युझिक'वर वेड लावायला येतंय 'बेसुरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 15:08 IST

'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी रितेश आणि जेनेलिया जोरदार प्रमोशन करत आहेत.

Ved Marathi Movie : बॉलिवुडची क्युट जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया 'वेड' या सिनेमात एकत्र दिसणार आहे. 'वेड' हा जेनेलियाचा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे तर रितेश पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे. वेडचे टीझर आणि टायटल सॉंगला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. आता या जोडीने अजुन एक 'गुड न्युज' दिली आहे. (Ved title song)

रितेश देशमुख आणि जेनेलिया हे कपल आता संगीत क्षेत्रातही उतरले आहेत. त्यांनी देश म्युझिक नावाने म्युझिक लेबल सुरु केले आहे. या लेबलखाली उद्या पहिलं गाणं देखील रिलीज केलं जाणार आहे. अजय अतुल ने संगीतबद्ध केलेलं, वेड सिनेमातील आणखी एक गाणं ते म्हणजे 'बेसुरी' उद्या १२ वाजता रिलीज केलं जाणार आहे.

वेड तुझा विरह वणवा या अजय अतुलच्या गाण्याने सरिकांना खरंच वेड लावले. आता बेसुरी हे गाणं कसं असेल याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. कारण अजय अतुलचं गाणं म्हणलं की जबरदस्त म्युझिक हे असणारच. Ved Song Teaser : 'वेड' तुझा गाण्याचं टीझर आलं, जेनेलिया नाही तर 'या' अभिनेत्रीसोबत रितेशचा रोमान्स

वेड हा सिनेमा ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी रितेश आणि जेनेलिया जोरदार प्रमोशन करत आहेत. तसेच या सिनेमात अभिनेत्री जिया शंकर ही देखील आहे. वेड तुझा गाण्यातील रितेश आणि तिच्या रोमान्सने सर्वांनाच भुरळ घातली आहे. 

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी अभिनेतासंगीत