अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा वेड चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. रितेश देशमुखने या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. तर जिनिलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३० दिवस उलटले असले तरी वेडची क्रेझ अद्याप कायम आहे. वेड चित्रपटाला शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा फटका बसेल, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात मात्र काही वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.
शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सहा दिवसांमध्ये या चित्रपटाने ६०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. दरम्यान या चित्रपटाच्या काही आठवड्या आधीच रितेशचा मराठी वेड चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहे.