बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी 'बेबी जॉन' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बेबी जॉन' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वरुण धवन थेट पुण्याला पोहोचला. पुण्यातील दगडूशेठ गणपती हलवाई मंदिराला भेट देत त्याने बाप्पाचं दर्शन घेतलं.
पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पावर अनेकांची श्रद्धा आहे. भाविक बाप्पाची मनोभावे पूजा करतात. तर अनेक सेलिब्रिटींचीही बाप्पावर श्रद्धा आहे. वरुण धवननेही सिनेमाच्या रिलीजआधी बाप्पाचं दर्शन घेतलं. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी तो नतमस्तक झाला. याचे फोटो इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत.
दरम्यान, 'बेबी जॉन' सिनेमामध्ये वरुण धवनचा कधीही न पाहिलेला रॉकिंग अंदाज पाहायला मिळत आहे. २५ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अॅटलीने केलं आहे. या सिनेमात वरुण धवनसह कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सलमान खान सिनेमात कॅमिओ करणार असल्याचं म्हटलं जात आहे.