'बॉर्डर २' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, सोशल मीडियावर या चित्रपटातील स्टारकास्ट, विशेषतः वरुण धवनला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. आता या वादात मूळ 'बॉर्डर' चित्रपटाचे स्टार सुनील शेट्टी यांनी उडी घेतली असून वरुण धवनची पाठराखण केली आहे.
नेमका वाद काय?
'बॉर्डर २' मध्ये वरुण धवनची निवड झाल्यापासून काही नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. 'बॉर्डर' सारख्या गंभीर युद्धपटात वरुण फिट बसणार नाही, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. तसेच, सिनेमाच्या ट्रेलरमधील वरुण धवनचा अभिनय आणि 'संदेसे आते है' गाण्यावर वरुण धवनने केलेल्या हावभावांवरुन त्याच्यावर लोकांनी टीका केली. आता यावर एका मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले की, "आजकाल चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अभिनेत्यांना ट्रोल करण्याची जणू फॅशन झाली आहे. वरुण हा एक अत्यंत मेहनती आणि प्रतिभावान अभिनेता आहे. त्याला संधी मिळण्यापूर्वीच जज करणे चुकीचे आहे. लोकांनी सिनेमा रिलीज होईपर्यंत थोडी वाट बघितली पाहिजे."
ते पुढे म्हणाले, "वरुणचे 'बॉर्डर २' मधील काम पाहून लोक थक्क होतील. जे लोक आज टीका करत आहेत, तेच उद्या त्याचे कौतुक करतील. कलाकारांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्यावर अशा प्रकारे टीका करणे दुर्दैवी आहे."
चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलताना सुनील शेट्टी यांनी सांगितले की, जुन्या गाण्यांची जादू आजही कायम आहे आणि नवीन चित्रपटातही तसाच दर्जा राखण्याचा प्रयत्न केला जाईल. "घर कब आओगे" सारख्या गाण्यांची आठवण आजही ताजी आहे आणि 'बॉर्डर २' मध्येही अशाच प्रकारची हृदयस्पर्शी गाणी असतील, याची सुनील यांनी खात्री दिली.
'बॉर्डर २' ची स्टारकास्ट:
अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या 'बॉर्डर २' या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहेत. सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी देखील या चित्रपटाद्वारे एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अन्य सिंग, मोना सिंग अशा अभिनेत्रींच्याही खास भूमिका आहेत.
Web Summary : Varun Dhawan's casting in 'Border 2' sparks online trolling. Sunil Shetty defends Dhawan, urging viewers to watch the film before judging. He praises Dhawan's talent and confirms the film will honor the original's musical legacy. The film releases January 23, 2026.
Web Summary : 'बॉर्डर 2' में वरुण धवन की कास्टिंग पर ट्रोलिंग। सुनील शेट्टी ने वरुण का बचाव किया और फिल्म देखने का आग्रह किया। उन्होंने धवन की प्रतिभा की प्रशंसा की और पुष्टि की कि फिल्म मूल संगीत की विरासत का सम्मान करेगी। फिल्म 23 जनवरी, 2026 को रिलीज होगी।