Vaibhav Mangle Post: सध्या सगळीकडे 'ज्यूनिअर कौन बनेगा करोपडपती' या शोची चर्चा आहे. या लोकप्रिय असलेल्या शोमध्ये बिग बींसमोर हॉट सीटवर अगदी हुशार मुलं बसलेली दिसत आहेत. दरम्यान, अलिकडेच केबीसीच्या १७ व्या सिजनमध्ये ईशीत भट्ट नावाचा ५ वी इयत्तेतला मुलगा सहभागी झाला होता. मात्र, याशोपेक्षा हॉट सीटवर बसलेल्या इशितने अभिताभ बच्चन यांना दिलेल्या उत्तरांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. इशित या शोमध्ये जिंकू शकला नाही, पण त्याने दिलेल्या उत्तरामुळे अनेकांना ट्रोल करायला सुरुवात केली.
केबीसीच्या शोदरम्यान, हॉट सीटवर येताच त्याचं अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं वागणं पाहून सोशल मीडियावर त्याला लोक प्रचंड ट्रोल करत आहेत. शिवाय काहीजण तर इशितला उद्धट म्हणत आहेत. आता ही ट्रोलिंवर लोकप्रिय मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत पोस्ट लिहित त्यामध्ये म्हटलंय, "केबीसीच्या प्रसिद्धीसाठी त्या मुलाचा वापर केला गेला असेल तर आपण एका भीषण वास्तवात आहोत. हकनाक त्या मुलाच्या भविष्याचा बळी दिला गेला. "अशा आशयाची पोस्ट शेअर करत त्यांनी ट्रोलिंगबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
काय घडलेलं?
केबीसीच्या एपिसोडमध्ये सुरुवातीला इशित हॉटसीटवर बसतो. त्यानंतर नियमानुसार, बिग बी त्याला त्याला खेळाचे नियम समजावून सांगतात. मात्र या मुलाने हॉटसीटवर बसल्यानंतर "तुम्ही मला आता नियम समजावत बसू नका.मला सगळं माहीत आहे", असं बिग बींना म्हटलं. एवढ्यावरच तो थांबला नाहीतर अमिताभ बच्चन यांनी पुढे प्रश्न विचारताच तो त्यांच्याशी उद्धटपणे बोलताना दिसला.
Web Summary : Vaibhav Mangle criticizes the trolling of Ishit Bhatt, a young KBC contestant, deeming it unfair. He suggests KBC might be exploiting the child for publicity, potentially harming his future, expressing his disapproval.
Web Summary : वैभव मांगले ने केबीसी प्रतियोगी ईशित भट्ट की ट्रोलिंग की आलोचना की। उनका मानना है कि केबीसी प्रचार के लिए बच्चे का इस्तेमाल कर रहा है, जो उसके भविष्य को नुकसान पहुंचा सकता है, और उन्होंने अपनी असहमति व्यक्त की।