Join us

Photos: मौनी रॉयच्या हळदीचे फोटो आले समोर; ग्लॅमरस लुकमुळे पुन्हा वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 16:29 IST

Mouni Roy haldi ceremony: मौनी आणि सूरज २७ तारखेला कँडोलिम येथे लग्न करणार आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) लवकरच प्रियकर सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar)  लग्न करणार आहे.  गोव्यात सूरज आणि मौनीचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडणार असून आता या दोघांकडे लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतेच मौनीच्या हळदी सोहळ्याचे फोटो समोर आले असून अल्पावधीत हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. 

फिल्मीकलाकार या इन्स्टाग्राम पेजवर मौनी रॉयच्या हळदीचे फोटो शेअर करण्यात आले आहे. या फोटोमध्ये मौनी आणि सूरज या दोघांना हळद लागल्याचं दिसून येत आहे.  यावेळी मौनीने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे. तर सूरजने पांढऱ्या रंगाची पठाणी घातल्याचं पाहायला मिळत आहे. 

गोव्यात पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्यात कोविड प्रोटोकॉलमुळे, मोजक्या पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीत मौनीचा लग्न सोहळा रंगणार आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लवकरच ही जोडी मुंबईत एक ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहेत.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, मौनी आणि सूरज २७ तारखेला कँडोलिम येथे लग्न करणार आहेत. मौनीच्या प्रियकराचं नाव सूरज नांबियार असं असून तो एक बॅकर आहे. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये होती. त्याचवेळी तिची आणि सूरजची ओळख झाली होती.

टॅग्स :मौनी राॅयसेलिब्रिटीबॉलिवूड