Join us

उन्नाव रेप केस : ट्विंकल खन्नाने केले ट्वीट अन् ट्रोल झाला अक्षय कुमार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 12:46 IST

अनेकांनी उन्नाव बलात्कार पीडितेला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. बॉलिवूडही याला अपवाद नाही. अभिनेता अक्षय कुमारची पत्नी  ट्विंकल खन्ना हिनेही यासंदर्भात एक  ट्वीट  केले. पण तिच्या या  ट्वीट नंतर तिचा पती अक्षय कुमारला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.  

ठळक मुद्देट्विंकलने ट्वीट केले पण अक्षयने मात्र या प्रकरणावर चकार शब्दही काढला नाही, याबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला.

उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणावर देशभर संतापाचे वातावरण आहे. उन्नाव बलात्काराच्या घटनेनंतर पीडित मुलीने तत्कालीन भाजपा आमदार कुलदीप सेनगर यांच्याविरूद्ध फिर्याद दिली होती. त्यानंतर पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना धमक्या दिला जात होत्या. याचदरम्यान पीडितेच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात पीडिता गंभीर जखमी झाली तर तिच्या कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यु झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर यासंबंधीत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांनी उन्नाव बलात्कार पीडितेला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. बॉलिवूडही याला अपवाद नाही. अभिनेता अक्षय कुमारची पत्नी  ट्विंकल खन्ना हिनेही यासंदर्भात एक  ट्वीट  केले. पण तिच्या या  ट्वीट नंतर तिचा पती अक्षय कुमारला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.  ‘मी प्रार्थना करते की, या मुलीला न्याय मिळो. हे खरंच खूप भयंकर आहे.

ट्रकच्या नंबर प्लेटवर काळे फासलेलं असणं आणि ती स्पष्ट न दिसणं हा यावरून हा अपघात योगायोग नव्हता, हे स्पष्ट होतं’ असे  ट्वीट  ट्विंकलने केले.  तिच्या या  ट्वीट नंतर लोकांनी अक्षय कुमारला फैलावर घेतले.   ट्विंकलने ट्वीट केले पण अक्षयने मात्र या प्रकरणावर चकार शब्दही काढला नाही, याबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला.

‘तुझ्याऐवजी अक्षयने पीडितेला पाठींबा दिला असता तर ते अधिक आवडले असते. पूर्वी मला अक्षय आवडायचा. मात्र गेल्या काही वर्षात त्याने स्वत:हून स्वत:ला डीग्रेड केले,’ असे एका युजरने यावर लिहिले. अन्य एका युजरने तर चांगलाच टोला हाणला. ‘ तुम्ही ट्वीट व्यतिरिक्त आणखी काय करु शकता मॅडम, जास्त ट्वीट करु नका नाहीतर तुमच्या नव-याला ‘मिशन मंगल’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळणार नाही,’ असे या युजरने लिहिले. अन्य युजर्सनी सुद्धा पुन्हा एकदा अक्षयच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा मुद्दा घेऊन त्याच्यावर निशाणा साधला.

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमारउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण