Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधी वेटर तर कधी लॉटरी विकायची बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, वाचा तिचा संघर्षमय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 17:09 IST

तिच्यावर अनेक वेळा ऑडिशन दरम्यान वाईट कमेंट्स केल्या जायच्या. 

आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.  नोराने ''स्ट्रीट डान्सर थ्रीडी' मध्ये नुकताच आपला जलवा दाखवला. या सिनेमात तिने केलेल्या डान्स सगळीकडेच कौतूक झाले.  सत्यमेव जयतेमधील 'दिलबर' गाण्यामुळे घराघरात पोहोचली आहे. आज आम्ही तुम्हाला नोराच्या आयुष्यातील काही माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. नोराने कधी वेटर तर कधी लॉटरी विकायचे काम केले आहे. 

बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नोराला खूप संघर्ष करावा लागला. स्ट्रगलिंगच्या दिवसांत नोरा PG म्हणून राहायची. त्यावेळी तिला हिंदी बोलता येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्यावर अनेक वेळा वाईट कमेंट्स केल्या जायच्या. 

न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान नोराने अनेक गोष्टींचा खुलासा केला. स्ट्रगलिंगच्या दिवसांत तिचा सामना एका कास्टिंग एजेंटशी झाला होता. त्याने नोराच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अश्लिल कमेंट्स केल्या. नोराची ऑडिशन दरम्यान हिंदी न येत असल्यामुळे खिल्ली उडवली जायची. अनेक वेळा ऑडिशन देऊन घरी परतल्यावर ती रडायची.      

 शाळेत असताना थट्टा केली जायची कारण तिला त्यावेळी डान्स करायला यायचा नाही. मात्र आज डान्ससाठी नोरा प्रत्येक निर्मात्याची पहिली चॉईस बनली आहे. 

टॅग्स :नोरा फतेही