Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा एकेकाळी बॉलीवूड गाजवलेल्या नम्रताचं सध्याचं 'वास्तव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 15:48 IST

बॉलीवूडमध्ये ठराविक चित्रपट करूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या नम्रता शिरोडकरने तिच्या वैयक्तिक आयुष्याला नेहमीच महत्व दिलं आहे.

ठळक मुद्देनम्रताने शेवटचा चित्रपट २००४ साली केला होता. नम्रताने तिच्या परिवाराला नेहमीच महत्व दिलं

बॉलिवूडमध्ये थोड्या कालावधीसाठी का होईना पण स्वत:च्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता शिरोडकर. 'वास्तव' सिनेमातील भारदस्त अभिनयाने तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. २००४ साली शेवटचा चित्रपट केल्यानंतर नम्रताने तिचा संपूर्ण वेळ परिवाराला देण्याचं ठरवलं.

  •  नम्रता मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मिनाक्षी शिरोडकर यांची नात आहे. तसंच नम्रताची बहीण शिल्पा शिरोडकरनेही सिनेसृष्टीत नाव कमावलं आहे. तसंच कोणतंही काम करताना परिवाराचा आधार महत्वाचा असतो असं नम्रता नेहमी म्हणते.

 

 

  •  नम्रता शिरोडकरने १९९३ साली 'मिस इंडिया' हा किताब मिळवला होता. 'मिस युनिवर्स' आणि 'मिस इंडिया एशिया पॅसेफिक'मध्येही तिने भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

 

 

  • नम्रताने १९९८ मध्ये सलमानसोबत 'जब प्यार किसीसे होता है' चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यानंतर नम्रता विविध जाहिरातींमधून दिसून आली.

 

 

  •  १९९९ साली आलेल्या 'वास्तव' चित्रपटात संजय दत्त सोबत काम केल्यावर तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला विविध पुरस्कार मिळाले. 'वास्तव' चित्रपटाने जणू तिला नवी ओळखच दिली.

 

 

  •  बॉलीवूडमध्ये काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर नम्रताचा कल दाक्षिणात्य चित्रपटांकडे वाढला. तिथेच तिची मैत्री तेलुगू कलाकार महेश बाबूंशी झाली. मैत्रीनंतर २००५ साली नम्रताने महेशसोबत विवाह केला. नम्रताला एक मुलगा व एक मुलगी असून ती सध्या हैदराबादला तिच्या परिवारासोबत राहते.