Join us
Daily Top 2Weekly Top 5

सावळ्या रंगामुळे झाली होती रिजेक्ट चित्रांगदा सिंग, मग गुलजार साहेबांनी दिला होता पहिला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 01:30 IST

हे. तिचा जन्म 28 मार्च 1976 साली राजस्थानच्या जयपूरमध्ये झाला. चित्रागंदाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

'हजारो ख्वाईशें ऐसी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या चित्रांगदा सिंगचे पहिल्या सिनेमातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून कौतुक झाले. चित्रागंदा आज तिचा वाढदिवस साजरा करते आहे. तिचा जन्म 28 मार्च 1976 साली राजस्थानच्या जयपूरमध्ये झाला. चित्रागंदाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात येण्यापूर्वी तिने दिल्लीमध्ये मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली होती. मॉडेलिंगनंतर चित्रांगदाने म्यूझिक व्हिडिओमध्ये काम केले. आपल्या सावळ्या रंगामुळे ती उत्तर भारतात वर्णभेदाची शिकार झाली होती. तिला मॉडलिंग असाइनमेंटदेखील मिळाली नाही. 

एका मुलाखतीत दरम्यान चित्रांगदा सिंग म्हणाली होती, त्वचेचा रंग बघून भेदभाव केला जातो, मात्र प्रत्येकजण गोरा रंग बघून काम नाही देत. सावळ्या रंगासोबत एक मुलगी म्हणून जगण्याचे महत्त्व मला माहिती आहे. लोक तुमच्या तोंडावर थेट बोलतील असे नाही, तुम्हाला फक्त ते जाणवू शकते.

 मी विशेषत: उत्तर भारतात वाढत असताना या प्रकारच्या भेदभावाचा बळी पडले आहे. चित्रांगदा मुंबईत येण्यापूर्वी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये रहात होती.चित्रांगदाला तिच्या  त्वचेच्या रंगामुळे मॉडेलिंगची असाइनमेंट कशी मिळाली नाही हे देखील सांगितले.

चित्रांगदा पुढे म्हणाली, 'मला मॉडेलिंग असाइनमेंटमध्ये घेण्यात आले नाही. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मला स्पष्टपणे सांगितले गेले होते की मी सावळी आहे. या ऑडिशन दरम्यान गुलजार साहेबांनी मला पाहिले आणि त्यांनी मला त्यांच्या म्युझिक व्हिडिओमध्ये घेतले. तेव्हा मला कळले की प्रत्येकजण रंग बघून काम देत नाही. चित्रांगदा लवकरच एका एक शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. तिने चित्रपटाचे संवाद आणि पटकथा देखील लिहिली आहे.

टॅग्स :चित्रांगदा सिंग