Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तिच्याचसोबत आता गावही संपलं'; 'मुरांबा'फेम अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 10:54 IST

Vipul salunkhe: 'मुरांबा' या मालिकेत विपुल, आनंद मुकादम ही भूमिका साकारत आहे. विपुल सोशल मीडियावर सक्रीय असून त्याच्या मालिकेविषयीचे अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'मुरांबा' (muramba) ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील कलाकारही दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहेत. यामध्येच मालिकेतील एका लोकप्रिय कलाकारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता विपुल साळुंखे (vipul salunkhe) याच्या आजीचं निधन झालं आहे.

'मुरांबा' या मालिकेत विपुल, आनंद मुकादम ही भूमिका साकारत आहे. विपुल सोशल मीडियावर सक्रीय असून त्याच्या मालिकेविषयीचे अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यामध्येच आता त्याने त्याच्या आजीचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. सोबतच एक भावुक पोस्टही लिहिली आहे.

"ज्या गोष्टीमुळे गावाला जायचं निमित्त शोधायचो...आज ती गोष्टंच कायमची संपली...सोबत गावाकडच्या रम्य आठवणीसुद्धा संपल्या, आणि तिच्याचसोबत आता गावही संपलं. आज्जी गेली...समाधानाने अनंतात विलीन झाली...!!!," असं कॅप्शन देत विपुलने त्याच्या आजीच्या निधनाची माहिती दिली.

दरम्यान, मुरांबा या मालिकेत विपुलची भूमिका विशेष लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेता शशांक केतकर मुख्य भूमिका साकारत आहे. तर,  शिवानी मुंडे ही रमाची तर, निशाणी बोरुडे ही रेवाची भूमिका साकारत आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनशशांक केतकर