Join us

'या' देशात सुरू होणार रोहित शेट्टीच्या सुपरहिट 'खतरों के खिलाडी14' शोचं शुटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 16:30 IST

खतरनाक स्टंटने भरलेला 'खतरों के खिलाडी' हा शो लवकरच सुरू होत आहे.

 प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमाचा 14 वा सीझन पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. बॉलिवूड, डेली सोप, म्युझिक इंडस्ट्री यासारख्या क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी या शोचे स्पर्धक म्हणून भाग घेत असतात. लवकरच 'खतरों के खिलाडी 14'चे शूटिंग सुरू आहे. शुटिंगसाठी एक खास ठिकाण निवडण्यात आलं आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी 14' चं शुटिंग हे रोमानियामध्ये होणार आहे. टीमने बुल्गारिया, थायलँड आणि जॉर्जिया या देशांची पाहणी केली होती. पण शेवटी रोमानिया हा देश निवडण्यात आला आहे. रिपोर्टनुसार स्पर्धकांची व्हिसा प्रकियाही सुरु करण्यात आली आहे. पण, याबाबत अद्याप खतरों के खिलाडी टीमकडून कोणतीही अधिकृता माहिती देण्यात आलेली नाही. 

दरम्यान  'खतरों के खिलाडी' सिझन 13 चं शुटिंग हे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झालं होतं. 'खतरों के खिलाडी 14' हा खास असणार आहे. या सीझनमध्ये सर्व स्पर्धक  'खतरों के खिलाडी 14' च्या ट्रॉफीसाठी खतरनाक स्टंट करणार आहेत. यंदाच्या सीझनमध्ये अभिषेक कुमार,  समर्थ जुरेल, सुमोना चक्रवर्ती, मन्नारा चोप्रा, शोएब इब्राहिम, मनिषा रानी,  गश्मीर महाजनी, अंकिता लोखंडे, नील भट्ट, हेली शाह या कलाकरांच्या नावाची चर्चा आहे. मे महिन्यात शुटिंगासाठी स्पर्धक रोमानियाला रवाना होणार आहेत. 

टॅग्स :रोहित शेट्टीसेलिब्रिटीटेलिव्हिजन