Join us

तितीक्षाला मिळालं युट्यूबचं सिल्व्हर बटण, पोस्ट शेअर करत म्हणते- "२०२३मध्ये चॅनेल सुरू केलं आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 12:01 IST

तितीक्षाचं युट्यूब चॅनेलदेखील आहे. तिच्या युट्यूब चॅनेलला सिल्व्हर बटण मिळालं आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

तितीक्षा तावडे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. तितीक्षाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तितीक्षाचं युट्यूब चॅनेलदेखील आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट्स देत असते. तिच्या युट्यूब चॅनेलला सिल्व्हर बटण मिळालं आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

तितीक्षाने युट्यूबच्या सिल्व्हर बटणचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने पोस्ट लिहिली आहे. "मी २०२३च्या नोव्हेंबर महिन्यात माझं युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. एक वर्ष पूर्ण होत आहे. २०२४च्या मार्च महिन्यात मला सिल्व्हर बटण मिळालं. हे पोस्ट करायला इतका वेळ का लागला ते माहीत नाही. पण, मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. तुमचं प्रेम आणि तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल थँक्यू. माझी सपोर्ट सिस्टिम असलेल्या सिद्धार्थला स्पेशल थँक्स. आय लव्ह यू. जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल कर प्लीज करा", असं तितीक्षाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

तितीक्षा तावडे या नावाने अभिनेत्रीचं युट्यूब चॅनेल आहे. सध्या तिच्या या चॅनेलचे १ लाख ६७ हजार सबस्क्राइबर्स आहेत. तितीक्षा मालिकेच्या सेटवरील व्हिडिओही युट्यूबवरून शेअर करत असते. तिच्या व्हिडिओला हजारोंमध्ये व्ह्यूज असतात. तितीक्षा सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'सरस्वती', 'तू अशी जवळी राहा', 'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकांमध्ये ती दिसली होती. 'शाबास मिथू' या बॉलिवूड सिनेमातही तितीक्षा झळकली आहे. 

टॅग्स :तितिक्षा तावडेटिव्ही कलाकार