Join us

तेजश्री प्रधानची नवी इनिंग! अभिनेत्रीचं पहिलं पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला, कसं कराल ऑर्डर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:10 IST

तेजश्रीच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. तेजश्रीची नवीन इनिंग सुरू झाली आहे.

तेजश्री प्रधान हा मराठी टेलिव्हिजनवरचा अत्यंत लाडका चेहरा आहे. अभिनेत्रीने मालिकांमध्ये साकारलेल्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. होणार सून मी या घरची या मालिकेत जान्हवीची भूमिका साकारून तेजश्री घराघरात पोहोचली. तेजश्रीला या भूमिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. आता तेजश्रीच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. तेजश्रीची  नवीन इनिंग सुरू झाली आहे. 

अभिनेत्री तेजश्री प्रधानचं पहिलं पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. याबाबत अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. या पुस्तकात तेजश्रीच्या निवडक मुलाखतींचा संग्रह करण्यात आला आहे. 'अभिनेत्री तेजश्री प्रधान निवडक मुलाखती' असं या पुस्तकाचं नाव असून त्याचं संपादन सुनील पांडे यांनी केलं आहे. तर प्राजक्त प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वेगवेगळ्या मुलाखतींत तेजश्रीने मांडलेले तिचे विचार या पुस्तकाच्या निमित्ताने एकाच ठिकाणी चाहत्यांना वाचता येणार आहेत. तेजश्रीचं हे पुस्तक अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. 

दरम्यान, तेजश्रीने 'होणार सून मी ह्या घरची', 'अगंबाई सासूबाई', 'प्रेमाची गोष्ट' या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. काही दिवसांपूर्वीच तिने प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेतली. याबरोबरच तेजश्रीने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'हॅशटॅग तदैव लग्नम', 'झेंडा', 'लोकशाही', 'ती सध्या काय करते', 'असेही एकदा व्हावे', 'पंचक', 'लग्न पाहावे करून', 'ओली की सुकी' या सिनेमांमध्ये ती दिसली होती. 

टॅग्स :तेजश्री प्रधान टिव्ही कलाकार