Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर ८ महिन्यांत बनली आई अन् २ वर्षांतच घटस्फोट! आता दुसऱ्या पतीपासून पुन्हा गरोदर आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:47 IST

टीव्ही अभिनेत्री सौम्या सेठ पुन्हा एकदा आई होणार आहे. सौम्या दुसऱ्या पतीपासून गरोदर असून तिने सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींनी आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. आता आणखी एका अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार आहे. टीव्ही अभिनेत्री सौम्या सेठ पुन्हा एकदा आई होणार आहे. सौम्या दुसऱ्या पतीपासून गरोदर असून तिने सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

सौम्याने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सौम्या तिचा दुसरा पती आणि लेकासोबत दिसत आहे. "लवकरच आमचं ४ जणांचं कुटुंब होणार आहे", असं म्हणत तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. सौम्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसीनेही तिच्या या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्रीचं अभिनंदन केलं आहे. 

दरम्यान, सौम्या ही बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आहे. छोट्या पडद्यावरील नव्या या मालिकेने सौम्याला ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर  'चक्रवर्ती अशोक सम्राट','दिल की नजर से खूबसूरत' या मालिकांमध्येही ती दिसली होती.  करिअरच्या शिखरावर असतानाच सौम्याने २०१७ साली अमेरिकेत राहत असलेल्या अभिनेता अरुण कपूरसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर ८ महिन्यांतच तिने पहिल्या बाळाला जन्म दिला. मात्र, पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत तिने लग्नानंतर २ वर्षांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर २०२३मध्ये सौम्याने आर्किटेक्ट शुभम चुहाडियासोबत दुसऱ्यांदा संसार थाटला. आता सौम्या शुभमच्या बाळाची आई होणार आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारगर्भवती महिला