Join us

"माझे हात पाय थंड पडले" सुशांतचा तो शेवटचा फोटो पाहिल्यावर काय वाटलं होतं? अंकिताचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 08:50 IST

जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा मला वाटलं...

बिग बॉस १७ (Bigg Boss 17) मध्ये अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) पुन्हा एकदा सुशांतसिह राजपूतच्या (Sushantsingh Rajput) आठवणींना उजाळा दिला आहे. तिने बिग बॉसच्या घरात सुशांतबद्दल अनेक खुलासे केले आहेत. अंकिता आणि सुशांत अनेक वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. नंतर त्यांचं नातं वाईट वळणावर येत तुटलं. गेल्या एपिसोडमध्ये अंकिताने मुनव्वर फारुकीसोबत सुशांतबद्दल संवाद साधला. यावेळी तिने सुशांतचा शेवटचा फोटो पाहिल्यावर तिचे काय हाल झाले हे सांगितलं.

मुन्नावर फारुकीसोबत गप्पा मारताना अंकिताने सुशांतच्या निधनानंतर झालेल्या ट्रोलिंगवर चर्चा केली. इतकंच नाही तर सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा एक शेवटचा फोटो व्हायरल होत होता जो काळीज पिळवटून टाकणारा होता. तो फोटो पाहून अंकिताची काय रिअॅक्शन होती याचाही तिने खुलासा केला. अंकिता म्हणाली, "जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा मला वाटलं सगळं संपलं. त्याने इतके सिनेमे केले आणि आता काय सगळं संपलं एका झटक्यात. जेव्हा मी त्याचा तो शेवटचा फोटो पाहिला. माझे हात पाय थंड पडले होते. असं वाटलं तो शांत झोपलाय. किती काय होतं त्याच्या डोक्यात. कमालीचा हुशार होता तो. प्रत्येक गोष्टीत बाप होता तो. कोणत्या तरी गोष्टीमुळे तो कोसळला. मी त्याला चांगलं ओळखत होते. आता काही नाही राहिलं फक्त शरीर राहिलं होतं."

मुन्नावरने सुशांतच्या कुटुंबाविषयी विचारल्यावर अंकिता म्हणाली, "त्याची एक बहीण अमेरिकेत होती. दुसरी चंदीगढला होती. त्याचे वडील फक्त पटनामध्ये होते. तर बाकी लोक दिल्लीत होते. उच्चशिक्षित कुटुंब आहे ते."

सध्या अंकिता पती विकी जैनसह बिग बॉसच्या घरात स्पर्धक आहेत. अंकिताचं विजेतेपदाचं पारडं जड आहे. तर मुन्नावर फारुकीही तिच्या टक्करला आहे. मात्र दोघांचं घरातील नातं मैत्रीचं आहे.  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडेबिग बॉससोशल मीडिया