Join us

छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्याला बलात्कार प्रकरणात करण्यात आली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 15:28 IST

या अभिनेत्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असून तो एक खूप चांगला गायक देखील आहे.

ठळक मुद्देमहिलेने करणच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कारवाई करत करणला अटक केली आहे. करणवर केवळ बलात्काराचाच नव्हे तर ब्लेकमेलचा देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिलन, साया, जस्सी जैसी कोई नही यांसारख्या अनेक मालिकांमध्ये करण ऑबेरॉयने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. बँड ऑफ बॉईज या प्रसिद्ध म्युझिक ग्रुपचा देखील तो हिस्सा आहे. त्याच्यावर एका महिलेने बलात्कार करण्याचा आरोप लावला असून त्याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. ही महिला व्यवसायाने ज्योतिषी असून मुंबईत राहाणारी आहे. करणने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला असल्याचे तिने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

या महिलेने करणच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कारवाई करत करणला अटक केली आहे. करणवर केवळ बलात्काराचाच नव्हे तर ब्लेकमेलचा देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून तिला करणने ब्लॅकमेल केले आणि पैसे उकळले असे या महिलेने म्हटले आहे. एएनआईने दिलेल्या बातमीनुसार, ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये ही केस दाखल करण्यात आली असून बलात्कार (कलम 376) वसुली (कलम 384) अंतर्गत त्याच्यावर केस दाखल करण्यात आली आहे. करणने महिलेवर बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओ चित्रण केले आणि तिला या व्हिडिओवरून ब्लॅकमेल केले आणि तिच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. करणला आज अंधेरी कोर्टात उपस्थित केले जाणार आहे.

करण हा प्रसिद्ध अभिनेता, गायक असून त्याचे आणि जस्सी जैसी कोई नही फेम मोना सिंगचे अनेक वर्षं अफेअर होते. जस्सी जैसी कोई नही या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली होती. तिथेच त्यांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात केली. अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. 

करणने स्वाभिमान या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1995 साली आलेल्या या मालिकेतील त्याच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळाली होती. करणने मालिकांप्रमाणेच किस किस को या चित्रपटात देखील काम केले आहे. 

टॅग्स :मोना सिंग