Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार कोकणात करतेय शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 06:30 IST

गायत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नव्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचं सांगितलं.

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. या मालिकेनं काही महिन्यांपूर्वी निरोप घेतला असला तरीदेखील या मालिकेतील कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केलं आहे. गायत्री सोशल मी़डियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून अपडेट देत असते. नुकताच तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोतून ती कोणत्या तरी नवीन प्रोजेक्टवर काम करत असल्याचं दिसत आहे.

गायत्री दातार हिने इंस्टाग्रामवर तिचा फोटो शेअर करत लिहिले की, नवीन काहीतरी लवकरच.

गायत्रीच्या या फोटोवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. तर तिचे चाहते तिच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

गायत्रीने अद्याप हे कोणत्या चित्रपटाचं की मालिकेचं शूट आहे, हे जाहीर केलेले नाही. मात्र गावातील कौलारू घर आणि आजूबाजूला नारळी बाग दिसत आहे. तिने हॅशटॅगमध्ये दापोली व गुहागर लिहिले आहे. त्यामुळे आता गायत्री तिच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल कधी घोषणा करते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक रवी जाधवने गायत्रीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता आणि तुला पाहते रे २ असं कॅप्शन दिलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना वाटलं होतं की तुला पाहते रे मालिकेचा सीक्वल येतो की काय मात्र रवी जाधवने या फोटोसोबत मस्करी केल्याचं सांगितलं होतं. त्यावेळीदेखील गायत्री रवी जाधवसोबत कोणत्या प्रोजेक्टवर काम करते आहे हे समजले नाही.

तर गायत्री दातारच्या कामाबद्दल सांगायचं तर ‘तुला पाहते रे’ या मालिकेनं निरोप घेतल्यानंतर आता गायत्री प्रथमच निम्मा शिम्मा राक्षस या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे.या नाटकात ती शहजादीच्या भूमिका साकारते आहे.

याशिवाय ती कोल्हापूर डायरिज चित्रपटात झळकणार आहे. 

टॅग्स :गायत्री दातारतुला पाहते रेरवी जाधव