Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तू चाल पुढं' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, विवाहसोहळ्याचे फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 17:12 IST

मराठमोळ्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सध्या कलाविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहे. काही दिवसांपूर्वी का रे दुरावा फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने गुपचूप लग्न उरकत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता आणखी एक मराठमोळा अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. टीव्ही मालिकांमध्ये काम करून घराघरात पोहोचलेल्या ध्रुव दातारने विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. 

ध्रुवने मैत्रीण अक्षता तिखेशी लग्नगाठ बांधली आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत ध्रुवने अक्षतासोबत सप्तपदी घेतले. ध्रुव आणि अक्षताने १४ मे रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर ध्रुवचे ग्रहमख आणि हळदीचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते. आता त्याचे लग्नाच्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नासाठी ध्रुव आणि अक्षताने खास पारंपरिक लूक केला होता. ध्रुवने सदरा परिधान करत राजबिंडा दिसत होता. तर अक्षताने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. कलाविश्वातील या नव्या जोडप्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, ध्रुव 'तू चाल पुढे' मालिकेतून घराघरात पोहोचला. या मालिकेतील त्याची भूमिका लक्षवेधी ठरली होती. सध्या तो 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. तर अक्षता ही नृत्यांगना आहे. तिने भरतनाट्यमचे धडे गिरवलेले असून आता ती कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहे. मेराकी नावाने तिचा स्वतःचा डान्स क्लास आहे.दातार आणि अक्षता तिखे दोघेही कॉलेज पासूनचे मित्र आहेत. दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीटिव्ही कलाकार