Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनोज वाजपेयीच्या 'जोराम' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 20:09 IST

सर्व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये डंका गाजवणाऱ्या 'जोरम' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर समोर आला आहे. 

मनोज बाजपेयी बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. अनेक वेबसिरीज, चित्रपटातून त्यांने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.  सध्या मनोज वाजपेयी हे त्यांच्या 'जोरम' चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. सर्व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये डंका गाजवणाऱ्या 'जोरम' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर समोर आला आहे. 

'जोरम' हा थ्रिलर चित्रपट आहे. ज्यामध्ये मनोज वाजपेयी तीन वर्षाच्या मुलीच्या वडिलांची भूमिका केली आहे. जो आपल्या मुलीला वाचविण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरताना दिसतो. मुलीसाठी तो काहीही करायला तयार होतो. वेळप्रसंगी पोलिसांशी लढाही देतो असे त्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

'जोरम' हा 8 डिसेंबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. देवाशिष मुखर्जी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. 'जोरम' सिनेमाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक झालं. बुसान फिल्म फेस्टिव्हल, सिडनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, डर्बन फिल्म फेस्टिव्हल आणि एडिनबर्ग फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'जोरम'चा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता.

टॅग्स :मनोज वाजपेयीबॉलिवूड