Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती ही अभिनेत्री, या अभिनेत्यावर केला होता चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 10:37 IST

बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपमुळे ही अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली होती.

छोट्या पडद्यावरील उतरन व डायन या मालिकेत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री टीना दत्त या वर्षाच्या सुरूवातीला बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. आता ती नवीन जीवनसाथीच्या शोधात आहे. सध्या ती नवीन पार्टनर शोधत असली तरी तिला सिनेइंडस्ट्रीतील कोणताही व्यक्ती लाईफ पार्टनर म्हणून नको आहे.  टीना दत्त यावर्षी बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपमुळे खूप डिप्रेस झाली होती. इंग्रजी वेबसाईट हिंदुस्तान टाईम्सच्यानुसार, टीना दत्तने सांगितलं की, आता मी माझ्या जीवनाकडे पूर्णपणे लक्ष देणार आहे आणि संसार थाटायचा आहे. मात्र मला अशा व्यक्तीची सोबत नको आहे जो मनोरंजन जगताशी संबंधीत असेल.

टीनाने पुढे सांगितलं की, मला असा जीवनसाथी हवा आहे, जो प्रामाणिक असेल, लोकांचा सम्मान करत असेल.

मागील नात्याचा पश्चाताप व्यक्त करताना टीना म्हणाली की, मला त्याला सांगायचं होतं की सर्व काही संपलं आहे. मी पूर्णपणे त्याला चुकीचं म्हणणार नाही कारण मी नाजूक वयात प्रेम केलं होतं. मी प्रेमात वेडी झाली होती. मी स्वतः लाजीरवाण्या नात्यासाठी जबाबदार आहे कारण मी त्याला जसं हवं होतं तसं करू दिलं होतं.

ती पुढे म्हणाली की, जे काही झालं ते चांगलं झालं. कारण जो व्यक्ती तुमच्यावर हात उचलला तर तो मर्द नसतो. माझ्या या नात्यानंतर मला लोकांवर विश्वास ठेवायला भीती वाटते. त्यानंतर मी खूप डिप्रेस झाली होती. मी खूप त्रस्त असायचे. मी स्वतःला मेकअप रूममध्ये कोंडून ठेवायचे, रडत रहायचे. 

यावर्षी मार्च महिन्यात टीना दत्त चर्चेत आली होती जेव्हा तिने अभिनेता मोहित मल्होत्रावर इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता.

टीनाने सांगितलं की, मालिकेच्या शूटवेळी बऱ्याच समस्या येतात. त्यातील काही समस्या खूप वेदनादायक असतात. टीनाने हे प्रकरण प्रोडक्शन टीमसमोर ठेवलं होतं. त्यावेळी त्यांनी मदत केली होती.

टॅग्स :टिना दत्ता