Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' एकाच मुलाच्या प्रेमात होत्या ऐश्वर्या- मनिषा; प्रेमासाठी दोघींमध्ये झालेलं जोरदार भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 16:23 IST

Throwback: मनिषाने एका मासिकाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने 'माझ्यासाठी राजीवने ऐश्वर्याला सोडलं', असं विधान केलं होतं.

कलाविश्वात लव्ह, अफेअर, रिलेशनशीप या गोष्टी सेलिब्रिटींसाठी नवीन नाहीत. दररोज येथे अनेक कलाकार त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत येत असतात. सध्या अशीच चर्चा बॉलिवूडमधील दोन टॉपच्या अभिनेत्रींविषयी रंगली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय (aishwarya rai) आणि मनिषा कोईराला (manisha koirala) या दोघी जणी एकेकाळी एकाच मुलावर प्रेम करत होत्या. इतकंच नाही तर या मुलाचं प्रेम मिळावं यासाठी दोघींमध्ये जोरदार भांडणदेखील झालं होतं. 

९० च्या दशकात राजीव मूलचंदानी हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठं नाव होतं. त्याकाळी या मॉडेलच्या प्रेमात अनेक तरुणी पडल्या होत्या. त्यामुळे ऐश्वर्या आणि मनिषादेखील याला अपवाद नव्हत्या. परंतु, राजीवचं प्रेम मिळवण्यासाठी दोघींमध्ये वाद झाल्याचं सांगण्यात येतं.

१९९४ मध्ये ऐश्वर्या मिस वर्ल्ड ठरली आणि तेव्हापासून तिच्याकडे निर्मात, दिग्दर्शकांच्या रांगा लागू लागल्या. ऐश्वर्याने आपल्या चित्रपटात काम करावं अशी अनेक दिग्दर्शकांची इच्छा होती. परंतु, लोकप्रियता मिळवल्यावरही ऐश्वर्याचा ‘जीन्स’ आणि ‘और प्यार हो गया’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले होते. तर दुसरीकडे मनिषा त्यावेळी टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. याच काळात मनिषाने एका मासिकाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने माझ्यासाठी राजीवने ऐश्वर्याला सोडलं, असं विधान केलं होतं. तिच्या या वाक्यामुळे त्याकाळी तुफान चर्चा झाली होती. 

"मी राजीवला डेट करतीये आणि माझ्यासाठी त्याने ऐश्वर्यालाही सोडलं", असं मनिषा म्हणाली होती. विशेष म्हणजे तिच्या या मुलाखतीनंतर ऐश्वर्या रात्रभर रडत होती असं सांगण्यात येतं. परंतु, या मुलाखतीनंतर ऐश्वर्यानेही मनिषाला सणसणीत टोला लगावला होता.

१९९९ मध्ये ऐश्वर्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने मनिषाला प्रत्युत्तर दिलं होतं. "मी राजीव व मनिषाच्या लव्हस्टोरीचा भाग नाही. दोन महिन्यानंतर त्या दोघांचा ब्रेकअप झाला. मनिषा प्रत्येक महिन्याला नव्या बॉयफ्रेंडसोबत असते. खरं तर तिच्या ‘बॉम्बे’ चित्रपटातील अभिनय पाहून मी तिला शुभेच्छा देणार होते. पण, पुन्हा तिने माझ्या विरोधात नको ती वक्तव्य केली", असं ऐश्वर्या म्हणाली.

पुढे ती म्हणते,  "जर माझ्यामुळे तिचा आणि राजीवचा ब्रेकअप झाला असेल तर तिने सगळं काही जाहीरपणे सांगावं. चार वर्षांनंतर हा मुद्दाम पुन्हा उकरुन काढणं याला काहीच अर्थ नाही. जर तिने रेखा व श्रीदेवीसारख्या दिग्गजांचा मान ठेवला नाही तर तिच्यासमोर मी कोण आहे?  पण तरी ती तिच्या आयुष्यात आनंदात रहावी इतकंच म्हणेन."

दरम्यान, मनिषा- ऐश्वर्या यांच्यातील वाद जरी जुना असला तरीदेखील त्याची आजही चाहत्यांमध्ये चर्चा होते. राजीव मूलचंदानी याच्यासोबतच दोन्ही अभिनेत्रींचं अफेअर चांगलंच चर्चेत राहिलं होतं. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनमनिषा कोईरालाबॉलिवूडसेलिब्रिटी