Join us

Video: असा शूट झाला 'आई कुठे काय करते'चा मंगळागौर एपिसोड, संजना-कांचनआजींनी घातली फुगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 15:11 IST

आई कुठे काय करते मालिकेत मंगळागौर विशेष भाग पाहायला मिळणार आहे. यावेळी देशमुख कुटुंबातील स्त्रिया मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत (aai kuthe kay karte)

'आई कुठे काय करते' मालिका सर्वांच्या आवडीची. ही मालिका गेली ४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेमध्ये येत असणारे ट्विस्ट अँड टर्न आणि वळण घेणारं कथानक यामुळे मालिकेला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळतंय. 'आई कुठे काय करते' मालिकेत मंगळागौरीचा विशेष एपिसोड बघायला मिळणार आहे. यावेळी देशमुख कुटुंबातील स्त्रिया पारंपरिक अंदाजात सजून मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत. 

'आई कुठे काय करते'मध्ये रंगणार मंगळागौर

'आई कुठे काय करते' मालिकेत मंगळागौरीचा विशेष एपिसोड बघायला मिळणार आहे. मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने या भागाच्या शूटींगचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडीओत मंगळागौरीच्या विशेष भागाचं शूटींग दिसून येतं. सुरुवातीला मालिकेतील संजना-अनघा-आरोही या तिघी एकत्र पंचारती घेऊन आरती करतात. पुढे बायका एकत्र येऊन मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसतात. 

संजना-कांचनआजींनी घातली फुगडी

'आई कुठे काय करते' मालिकेच्या मंगळागौरीच्या विशेष भागात पुढे पाहायला मिळतं की, संजना ही कांचनआजी आणि एका महिलेसोबत फुगडी घालताना दिसते. कांचन आणि संजना या सासू-सुनेची फुगडी जुगलबंदी बघायला मजा येणार हे निश्चित. 'आई कुठे काय करते' मालिकेने नुकताच १४०० भागांचा टप्पा ओलांडला आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वी 'सुगरण जोडी' ट्रॅक पाहायला मिळाला. या स्पर्धेत अरुंधती-मिहिरने बाजी मारल्याने संजनाचा चांगलाच जळफळाट झालेला दिसला. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामिलिंद गवळीरुपाली भोसलेमधुराणी प्रभुलकर