Join us

अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 19:09 IST

Shefali Jariwala Last Wish: २७ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे शेफाली जरीवालाने या जगाचा निरोप घेतला. ती फक्त ४२ वर्षांची होती. अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Shefali Jariwala Last Wish: २००२ मध्ये 'कांटा लगा' या गाण्याने धुमाकूळ घालणाऱ्या शेफाली जरीवाला(Shefali Jariwala)ला कोण ओळखत नाही. २७ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे शेफालीने या जगाचा निरोप घेतला. ती फक्त ४२ वर्षांची होती. अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. शेफाली जरीवालाची एक इच्छा कायमची अपूर्ण राहिली. ज्यासाठी ती तिचा पती पराग त्यागीसोबत नियोजन करत होती. शेफालीचे अखेरचे स्वप्न काय होते ते जाणून घेऊयात.

'कांटा लगा' या गाण्याने प्रसिद्धी मिळवलेली शेफाली जरीवाला बी टाउनची एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणूनही ओळखली जात होती. तिच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. शेफालीने वयाच्या १२ व्या वर्षी एक स्वप्न पाहिले होते. खरेतर, शेफाली जरीवाला यांनी दोनदा लग्न केले होते आणि दोन्ही लग्नांमधून तिला आई होण्याचा आनंद मिळू शकला नाही. तिला खऱ्या आयुष्यात आई व्हायचे होते आणि जर नैसर्गिकरित्या नसेल तर मूल दत्तक घेऊन.

शेफालीला व्हायचं होतं आई

शेफालीने पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये याबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, मला वयाच्या १२ व्या वर्षापासून आई व्हायचे होते. माझे दोनदा लग्न झाले आणि दोन्ही लग्नातून हे शक्य झाले नाही. यानंतर, मला मुलं दत्तक घ्यायची आहेत, परंतु त्यांची प्रक्रिया खूप लांब आहे. मी परागशी या विषयावर बोलले आहे आणि तो देखील तयार आहे. खरेतर, पराग आणि माझ्या वयात खूप फरक आहे, प्रत्येक शक्य प्रयत्नानंतर ते आता नैसर्गिक पद्धतीने शक्य नाही. आई होण्याचा आनंद हा सर्वात मोठा आनंद आहे.

शेफालीची झाली होती दोन लग्नअशाप्रकारे शेफाली जरीवालाचे आई होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. याशिवाय, पती पराग त्यागीसोबत तिचे हे नियोजन कधीही पूर्ण होणार नाही. २००३ मध्ये शेफाली जरीवालाने २००४ मध्ये हरमीत सिंगशी पहिले लग्न केले होते, परंतु २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर, २०१४ मध्ये तिने पराग त्यागीला तिचा दुसरा जीवनसाथी बनवले.

टॅग्स :शेफाली जरीवालाहृदयविकाराचा झटकाटिव्ही कलाकारबिग बॉस