Join us

'चला हवा येऊ द्याटमधील' या कलाकाराने शेअर केला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाला-त्यांच्यासोबत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 19:21 IST

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य प्रत्येक कलाकाराला आपल्या नशीबी यावं असं वाटतं असतं. अनेकांचं हे स्वप्न असतं ..

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य प्रत्येक कलाकाराला आपल्या नशीबी यावं असं वाटतं असतं. अनेकांचं हे स्वप्न असतं ...असंचं स्वप्न अभिनेते भारत गणेशपुरे यांनी बाळगलं होतं आणि ते पूर्णही झालंही.....झुंड या सिनेमाच्या निमित्ताने भारत यांचं हे स्वप्न पूर्ण झालंय.....झुंड या सिनेमात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या कलाकारांसह अभिनेता भारत गणेशपुरे यांनीही भूमिका साकारलीये. त्यांच्या या भूमिकेचे सर्वजण कौतुक होतय... नुकताच त्यांनी बिग बींन सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय...हा फोटो शेअर करत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव चाहत्यांसोबत  शेअर केलाय...त्यांनी म्हटलय की,त्यांच्यासोबत काम करणे नेहमीच प्रेरणादायी असते.त्यांची ही पोस्ट काही क्षणातच व्हायरल झालीये...झुंडआधी भारत हे सलमान खानच्या अंतिम मध्ये तसेच हॅलो चार्ली झळकले आहेत.त्यावेळीही ते चर्चेत आले होते.भारत गणेशपुरे यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत पण चला हवा येऊ द्या मधून ते यशाच्या शिखरावर पोहचले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झाले. 

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंडमध्ये सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. या सिनेमावर फक्त चाहत्यांकडूनच नाही तर कलाकारांकडूनही कौतुकाचा वर्षाव होतोय...झुंड या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती.  तीन दिवसात या सिनेमाने जवळपास ७ कोटींची कमाई केली. झुंड हा सिनेमा स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनभारत गणेशपुरेचला हवा येऊ द्या