Join us

"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 10:47 IST

Rajeshwari Kharat : राजेश्वरी खरात हिने अलिकडेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे सांगितले होतं. त्यानंतर तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला खूप ट्रोल केलं.

'फॅण्ड्री' (Fandry Movie) चित्रपटातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे सांगितले. तिच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं. त्यानंतर तिने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत ट्रोलर्सला चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

राजेश्वरी खरात हिने अलिकडेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे सांगितले होतं. त्यानंतर तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला खूप ट्रोल केलं. दूसऱ्या धर्माची गरज लागतेच कशाला..? असं काहींनी म्हटलं. तर काहींनी तिला अनफॉलो केलं. त्यानंतर राजेश्वरीने इंस्टाग्राम स्टोरीवर ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं. 

अभिनेत्रीने ट्रोलर्सला लगावले खडेबोल

राजेश्वरीने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ''निवडणुका, प्रत्येकी ५०० रुपये, किराणा भरुन पिशव्या, दारु व हॉटेलला जेवण आणि साहेब, दैवत, देव माणूस… हे आज धर्म, जात शिकवायला आले आहेत तर तुमचं स्वागत. कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे.''

''माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील''

राजेश्वरीने पुढे स्पष्ट सांगितले की, तिचा जन्म ख्रिस्ती कुटुंबातच झाला आहे. तिने म्हटले की, ''टीप – माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्माचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्वीकारली जावी एवढी विनंती. '' दरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावरील ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे आणि ट्रोलर्सला दिलेले उत्तर डिलिट करून टाकले आहे. 

टॅग्स :राजेश्वरी खरात