Join us  

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या ३ अभिनेत्री होणार विवाहबद्ध, एकीच्या लग्नाचा फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 1:17 PM

मराठी सिनेइंडस्ट्रीत गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्यांना उधाण आले आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्रींची लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्यांना उधाण आले आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्रींची लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे. गौतमी देशपांडे (Gautami Deshpande), स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) यांचा हळदी आणि संगीत सोहळा काल पार पडला. त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. तसेच रंग माझा वेगळा फेम मानसी घाटे (Manasi Ghate) हिचा देखील काल हळदीचा कार्यक्रम पार पडला. आज २५ डिसेंबर रोजी एकाच दिवशी या तीन अभिनेत्री विवाहबद्ध होणार आहेत. दरम्यान आता अभिनेत्री गौतमी देशपांडे हिच्या लग्नाचा फोटो समोर आला आहे. 

इंडियन आयडॉल १४ फेम आशिष कुलकर्णी सोबत स्वानंदी टिकेकरने साखरपुड्यानंतर डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. तर गेल्या काही दिवसांपासून तिच्या केळवणाचे फोटो देखील पाहायला मिळाले. काल स्वानंदीने आशिषची हळद आणि संगीत सेरेमनी पार पडली. त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. स्वानंदी आणि आशिष आज पुण्यात लग्न करत आहेत.

तर अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने दोन दिवसांपूर्वी स्वानंद तेंडुलकर सोबत लग्न करत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले. त्याअगोदर आदल्या दिवशी मृण्मयीने त्या दोघांचे केळवण साजरे केले होते. तर शनिवारी गौतमीने तिच्या हातावर स्वानंदच्या नावाची मेहंदी सजली. काल हळदी सेरेमनी आणि संगीत सोहळा पार पडला. नुकतेच गौतमी आणि स्वानंदी विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

तसेच रंग माझा वेगळा फेम साक्षी उर्फ मानसी घाटे देखील आज लग्नगाठ बांधणार आहे. ती आकाश पंडीतसोबत लग्न करणार आहे. त्यांचा काल हळदी सेरेमनी पार पडली. त्या दोघांचे आज ठाण्यात लग्न पार पडणार आहे.

मानसीचा नवरा आकाश पंडीत हा सिनेइंडस्ट्रीतलाच आहे. तो लाइटिंग डिझायनर म्हणून कार्यरत आहे. नुकताच सुहाना खान, अगस्त्य नंदाचा रिलीज झालेला आर्चीजसाठी काम केले आहे. 

टॅग्स :स्वानंदी टिकेकरगौतमी देशपांडे