Join us

'आदिपुरुष'च्या सेटवर देवदत्त नागेला सैफ अन् प्रभासकडून मिळाली अशी वागणूक; अभिनेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 16:53 IST

Devdutt Nage: 'आदिपुरुष' या सिनेमा देवदत्त नागे महत्त्वाची भूमिका साकारत असून त्याची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली आहे.

प्रसिद्ध मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाची सध्या तुफान चर्चा रंगत आहे. ओम राऊत यांनी तान्हाजीनंतर आदिपुरुषची घोषणा केली आणि तेव्हापासून या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. अलिकडेच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.  त्यामुळे या सिनेमाविषयी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली. यात सध्या मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे चर्चेत येत आहे. आदिपुरुष मध्ये तो हनुमानाची भूमिका साकारत असून त्याने सेटवरील त्याचा अनुभव शेअर केला आहे.

'आदिपुरुष' या सिनेमा देवदत्त नागे महत्त्वाची भूमिका साकारत असून त्याची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली आहे. यात अलिकडेच त्याने लोकसत्ताला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत आदिपुरुषच्या सेटवरचं वातावरण कसं होतं हे सांगितलं.

Adipurush: सैफ, प्रभासने घेतलं तगडं मानधन, पण देवदत्त नागेने मात्र...

"या सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण होईपर्यंत प्रभास किंवा सैफ अली खान या दोघांनीही कधीही आपण सुपरस्टार आहोत असा आव आणला नाही. त्यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर काम करताना खरंच खूप मज्जा आली आणि अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या", असं देवदत्त नागे याने सांगितलं.

दरम्यान, आदिपुरुष हा बिग बजेट चित्रपट असून प्रत्येक कलाकाराने प्रचंड मानधन घेतलं आहे. आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असेल.  

टॅग्स :आदिपुरूषदेवदत्त नागेसैफ अली खान प्रभाससेलिब्रिटीबॉलिवूड