Join us

फिटनेस फ्रिक दिप्ती साकारणार नगरसेविकेची भूमिका; 'भिरकीट'मधील फर्स्ट लूक समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 19:00 IST

Dipti dhotre: 'मुळशी पॅटर्न', 'भोंगा' अशा कितीतरी चित्रपटात झळकलेली दिप्ती लवकरच 'भिरकीट' या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

गेल्या काही काळात मराठी कलाविश्वात अनेक नवोदित कलाकारांची एन्ट्री झाली आहे. यात काहींनी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. तर, काही जण अद्यापही स्ट्रगल करत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे दिप्ती धोत्रे (Dipti dhotre). अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या कलाकारांच्या यादीत दिप्तीचं नाव घेतलं जातं. 'मुळशी पॅटर्न', 'भोंगा' अशा कितीतरी चित्रपटात झळकलेली दिप्ती लवकरच 'भिरकीट' या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

अभिनयासोबतच फिटनेसकडे जातीने लक्ष देणारी दिप्ती लवकरच भिरकीट या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये दिप्तीचा लूक पाहून नेटकऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे. १७ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात दिप्ती एका नगरसेविकेची भूमिका साकारत आहे.  

कोण आहे दिप्ती धोत्रे?

दिप्ती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मुळशी पॅटर्न, भोंगा, विजेता आणि शेरशिवराज या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. दिप्ती अनेकदा तिच्या अभिनयासह फिटनेसमुळेही चर्चेत येत असते. 

दरम्यान,  भिरकीट या चित्रपटाचं दिग्दर्शन अशोक जगदाळे करत असून निर्मिती सुरेश ओसवाल करत आहेत. या चित्रपटात दिप्ती व्यतिरिक्त गिरीश कुलकर्णी, तानाजी गलगुंडे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, ऋषिकेश जोशी हे कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाकुशल बद्रिके