Join us

शिल्पा शेट्टीसमोरच फोटोग्राफर तंबाखू खात होता, अभिनेत्रीची नजर गेली अन् पुढे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 16:05 IST

शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिच्यासमोरच एक पापाराझी तंबाखू खात होता. पुढे शिल्पाने काय केलं बघा

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी चांगलीच चर्चेत असते. शिल्पा गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. शिल्पा सध्या एका रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिल्पा पारंपरिक ड्रेसमध्ये या व्हिडीओत दिसतेय. तिचे फोटो काढायला अनेक फोटोग्राफर समोर आलेले असतात. अचानक त्या फोटोग्राफरपैकी एक जण तिला तंबाखू खात असलेला दिसतो. त्यानंतर शिल्पा काय करते, जाणून घ्या.

फोटोग्राफर तंबाखू खात असतो, तेवढ्यात शिल्पा...

व्हायरल व्हिडीओमध्ये शिल्पा एका शूटिंग सेटबाहेर दिसते. तिथे जमलेल्या फोटोग्राफर्सपैकी एकाच्या तोंडात तंबाखू असल्याचं तिला दिसतं. तेव्हा ती त्याला हसत हसत पण स्पष्टपणे म्हणते, "तू इथे ये, मला तुझं तोंड बघायचंय... तंबाखू खाणं बंद कर!" शिल्पाचा हा अंदाज मस्तीखोर सर्वांना आवडला असला तरीही हसतखेळत शिल्पाने दिलेला  ठाम संदेश महत्वाचा आहे. तंबाखू खाणं आरोग्यासाठी घातक आहे, आणि सार्वजनिक ठिकाणी अशा सवयी टाळाव्यात, असं शिल्पाने त्याला सांगितलं. त्यामुळे अभिनेत्रीच्या कृतीचं कौतुक होतंय.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया चर्चेत

या व्हिडीओवर चाहत्यांनीही चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटलं की शिल्पा योग्य वेळेस योग्य गोष्ट बोलली. अनेकांनी तिच्या आरोग्यविषयक जागरूकतेचं कौतुक केलं आहे. काहींनी तर “शिल्पा खऱ्या अर्थानं फिटनेस आयकॉन आहे” अशी कमेंटही केली. शिल्पा शेट्टी नेहमीच आरोग्य, फिटनेस आणि योग्य जीवनशैलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती सध्या 'सुपर डान्सर' या शोमध्ये परीक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूडधूम्रपानतंबाखू बंदी