Join us

'या' तारखेला भेटीला येणार 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2, नवा प्रोमो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 16:37 IST

कपिलच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

The Great Indian Kapil Sharma : कॉमेडीयन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  नेटफ्लिक्सवर सुरु झालेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Kapil Sharma Show)चा पहिला सीझन प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता या या कार्यक्रमाचा दुसरा सीझन लवकरच नव्या अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन येत्या 21 सप्टेंबरपासून प्रत्येक शनिवारी नेटफ्लिक्सवर चाहत्यांना पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे.  प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहलं, "21 सप्टेंबरपासून तुमचा प्रत्येक शनिवार  मजेशीर बनवण्यासाठी आम्ही येतोय.  प्रत्येक शनिवार नाही तर 'Funnyवार'ला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी सज्ज व्हा".

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनमध्ये  कपिलसोबत कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोवर, किकू शारदा, अर्चना पूरण सिंह आणि राजीव ठाकूर हे देखील आहेत.  'द ग्रेट इंडियन कपिल शो चा पहिला सिझन हा १३ एपिसोडनंतर संपला होता. पहिल्या सीझनमध्ये बॉलिवूड, संगीत आणि क्रिकेटमधील काही दिग्गज कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. आता सिझन २ मध्ये कोणते सेलिब्रिटी पाहुणे म्हणून दिसणार हे पाहणे मनोरंजक असेल. 

टॅग्स :कपिल शर्मा नेटफ्लिक्सबॉलिवूडसेलिब्रिटी