Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारीच ! 'मन झालं बाजिंद'मधील कृष्णा फेम श्वेता खरातने खरेदी केली आलिशान कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 17:19 IST

मालिकेत श्वेता राजन (Shweta Rajan) साकारलेली कृष्णाच्या भूमिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

'मन झालं बाजिंद' (Man Jhala Bajind) या मालिकेत सध्या राया आणि कृष्णा या दोघांच्या नात्यात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताचं  मालिकेत व्हॅलेंटाइन डे साजरा केला गेला. या मालिकेतील श्वेता राजन (Shweta Rajan)ने साकारलेली कृष्णाच्या भूमिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज श्वेताचा खूप मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

श्वेताने नुकतीच नवी कोरी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'माय न्यू बेबी इन द हाऊस' असं कॅप्शन तिने हा व्हिडीओ शेअर करताना दिला आहे. श्वेतावर चाहत्यांसोबतच सर्व सेलिब्रेटी शुभेच्छा देत आहेत.

श्वेता राजनला ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील अज्या अर्थात नितीश चव्हाणसोबतच्या डान्स व्हिडीओत ती नेहमीच दिसते. श्वेता राजन खरात. ‘राजा राणीची गं जोडी’या मालिकेत संजीवनीची बेस्ट फ्रेण्ड अर्थात मोनाच्या रूपातही तुम्ही तिला पाहिलं असेल.  श्वेतानं ‘घेतला वसा टाकू नको’ मालिकेतील भगवान शंकराच्या पौराणिक कथेत महालक्ष्मीची भूमिका केली होती. मुळची साता-याची श्वेता उत्तम डान्सर आहे. ख-या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरसही आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी