Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्कर सुद्धा 'मस्तानी'च्या प्रेमात! दीपिकाचा खास व्हिडीओ केला शेअर, रणवीर सिंग बायकोचं कौतुक करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 13:25 IST

ऑस्करने दीपिकाचा एक खास व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे रणवीर सिंगला पत्नीचा अभिमान वाटला असून त्याने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. दीपिकाने आजवर विविध सिनेमांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. दीपिकाने केवळ भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा स्वतःचं नाव कमावलंय. २०२३ मध्ये दीपिकाने प्रतिष्ठित अशा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून भूमिका निभावली. ऑस्कर अकादमी सुद्धा दीपिकाच्या प्रेमात पडली असं दिसतंय. ऑस्करने दीपिकाचा व्हिडीओ शेअर केलाय. यावर तिचा पती रणवीर सिंगने केलेली कमेंट चांगलीच चर्चेत आहे.

 अलीकडेच ऑस्कर अकादमीने दीपिकाच्या 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटातील एका गाण्याची क्लिप त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केली आणि लिहिले, 'दीपिका पदुकोण 'दीवानी-मस्तानी' गाण्यावर परफॉर्म करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले असून हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे. 'दीवानी-मस्तानी' हे त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक होते.

दीपिका पदुकोणच्या गाण्याची क्लिप शेअर करत 'द अकॅडमी'ने पुढे लिहिले की, 'या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत प्रियंका चोप्रा देखील होती.' खुद्द ऑस्करसारख्या प्रतिष्ठित अकादमीने दीपिकाची दखल घेतल्याने या यशावर पती रणवीर सिंगने आनंद व्यक्त केला आहे. रणवीरने कमेंट सेक्शनमध्ये जाऊन पत्नी दीपिकाची स्तुती करताना लिहिले, 'मेस्मरिक'. सोशल मीडियावर दीपिकाचे चाहतेही ऑस्कर अकादमीच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव करत दीपिकावर भरभरून प्रेम करत आहेत.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगऑस्करसंजय लीला भन्साळी