Join us

Thalaivi : ट्रेलर प्रदर्शनापूर्वीच कंगना रनौत चर्चेत, फोटो पाहून उडवली जाते खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 15:04 IST

Kangana never stays out of news. पुन्हा एकदा कंगना ट्रोल होत आहे. विचित्र कमेंट्स करत तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत गेल्या काही महिन्यांपासून विविध गोष्टींमुळे चर्चेत आहे. पुन्हा एकदा कंगणाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे तिची चर्चा होत आहे.दरम्यान फोटो पाहून नेटिझन्स तिला वजन कमी करण्यासाठी टिप्स मागत आहेत.तर काहींनी तर बॉडीसूट आहे असे कमेंट्स करताना दिसत आहे.

कंगणाचा हा अंदाज निराळा आहे... मग तिचा रोल असो किंवा त्या रोलसाठी तिची फॅशन स्टेटमेंट... तिची प्रत्येक अदा लक्ष वेधून घेते. प्रत्येक सिनेमात कंगणाच्या लूकनं फॅन्सची मनं जिंकलीत.. आगामी थलैवी सिनेमासाठी तिने बरीच मेहनत घेतलीय.जयललिता यांच्या लूकप्रमाने तिचे लूक करण्यात आले आहेत. यातलेच निवडक लूक तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत. मात्र नेटिझन्सना तिचा ह लूक काही आवडला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कंगना ट्रोल होत आहे. विचित्र कमेंट्स करत तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

'थलैवी'चा ट्रेलर लाँच होण्यास अजून एक दिवस बाकी आहे. या बायोपिकसाठी काही महिन्यांत २० किलो वजन वाढविणे आणि नंतर काही दिवसांत ते कमी करणे हे माझ्यासमोर खूप मोठे आव्हान होते.प्रचंड मेहनत घेत हे लूक मिळवले असल्याचे कांगणाने सांगितले.त्यामुळे ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच कंगणा चर्चेत आहे. ट्रेलर पाहण्यासाठी उस्तुकता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :कंगना राणौतथलायवी