Join us

असे पडले 'अशोक' हे नाव, निवेदिता सराफ यांनी सांगितला नावामागाचा इंटरेस्टिंग किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 06:00 IST

Ashok Saraf : अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत.

अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) ही मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. या जोडीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तसेच बऱ्याचदा अशोक सराफ यांच्याबद्दल अनेक किस्से ऐकायला मिळत असतात. निवेदिता सराफ सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि त्या या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या नावाचा किस्सा सोशल मीडियावर सांगितला आहे.

अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांना मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हटले जाते. निवेदिता सराफ यांनी काही वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर अशोक सराफ आणि अशोक कुमार यांचा फोटो शेअर करत लिहिले होते की, गुरू शिष्य. मोठी बहीण विजया अशोक कुमारांची खूप मोठी चाहति त्यांच्या अभिनयानं ती खूप भारावून गेली होती. धाकट्या भावाचा जन्म झाला तेव्हा तिने हट्टानं त्याचं नाव अशोककुमार ठेवायला आईला भाग पाडलं. ईश्वरानेही तथास्तु म्हटलं. अशोककुमार सराफचाच् पुढे झाला अशोक सराफ.  चतुरस्त्र अभिनेता आज ७२व्या वर्षीही तितक्याच ताकदीने उत्साहाने ठामपणे उभा आहे आणि अशोककुमारांना गुरू स्थानी मानतो आहे.

मैत्री नंतर जुळलं प्रेम

अशोक सराफ आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती. निवेदिता जोशी आणि अशोक सराफ यांची मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेम जुळले. अशोक सराफ यांना त्यांनी प्रपोज देखील केले. त्यानंतर त्या दोघांनी मंगेशी मंदिरात जाऊन लग्न केले. 

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफअशोक कुमार