Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सत्यम शिवम सुंदरम'मधील 'ते' बोल्ड सीन पुन्हा चर्चेत, झीनत अमान यांनी शेअर केला व्हिडीओ, म्हणाल्या -"हे दृश्य माझ्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:06 IST

Zeenat Aman : बॉलिवूडची सदाबहार आणि बोल्ड अभिनेत्री झीनत अमान पुन्हा एकदा त्यांच्या सुपरहिट ठरलेल्या 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटातील इंटिमेट सीनमुळे चर्चेत आल्या आहेत.

बॉलिवूडची सदाबहार आणि बोल्ड अभिनेत्री झीनत अमान पुन्हा एकदा त्यांच्या सुपरहिट ठरलेल्या 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटातील इंटिमेट सीनमुळे चर्चेत आल्या आहेत. या सीन्सने एकेकाळी खूप धुमाकूळ घातला होता. अलिकडेच, झीनत अमान यांनी इंस्टाग्रामवर या चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि एक मनोरंजक किस्सा देखील लिहिला आहे. या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांच्या आठवणीच फक्त ताज्या झाल्या नाहीत तर त्यांच्या निरागस क्रशची कहाणीदेखील समोर आली.

झीनत अमान म्हणाल्या की, त्या शाळेत असल्यापासून त्यांचे शशी कपूर यांच्यावर खूप प्रेम होते. त्या पुढे म्हणाल्या की, ''त्यांच्या चमकदार डोळ्यांनी आणि मोहक हास्यामुळे शशी कपूर हे माझ्यासह प्रत्येक शाळेतील मुलीचे स्वप्न होते.'' त्यांना आठवले की ''त्यांनी शशी कपूर यांना पहिल्यांदा पाचगणीमध्ये पाहिले होते, जेव्हा ते शेक्सपियरच्या नाटकात भाग घेण्यासाठी आले होते. त्यावेळी झीनत अमान एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होत्या आणि त्यांच्या मैत्रिणींप्रमाणे त्याही शशी कपूर यांना पाहून फिदा झाल्या होत्या.''

झीनत यांनी विनोदी अंदाजात म्हटले की, ''शशी कपूर त्यांच्या घराजवळ राहत होते. त्यांना संध्याकाळी ६ वाजता फिरण्याची सवय होती, म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणी ताज्या हवेच्या बहाण्याने बाहेर जायचो, जेणेकरून आपण त्यांची एक झलक पाहू शकू.'' त्यांनी सांगितले की, ''शशी कपूर यांच्यासोबत त्यांचा पहिला ऑनस्क्रीन किसिंग सीन 'सत्यम शिवम सुंदरम'मध्ये होता, जो त्या काळात खूप वादग्रस्त ठरला होता, परंतु झीनत म्हणाल्या की, शूटिंग दरम्यान त्यांना अजिबात अस्वस्थ वाटत नव्हते.'' झीनत यांनी लिहिले, ''यामुळे माझ्या कारकिर्दीत मोठा बदल झाला. त्यावेळी गोंधळ झाला असला तरी, हे दृश्य माझ्यासाठी पवित्र होते.'' या पोस्टमध्ये झीनत अमान यांनी असेही लिहिले की, ''जर एखाद्या शाळकरी मुलीला माहित असेल की तिचा क्रश एके दिवशी खऱ्या आयुष्यात तिचा सहकलाकार बनू शकतो, अगदी फक्त पडद्यासाठीही, तर तिला किती आनंद होईल.''

शशी कपूर यांचं केलं कौतुकशशी कपूर यांची आठवण करून देताना झीनत अमान म्हणाल्या की, ''ते खूप प्रेमळ, बुद्धिमान आणि मजेशीर व्यक्ती होते. त्यांच्यासोबत काम करणे नेहमीच संस्मरणीय होते.'' झीनत अमान यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टॅग्स :झीनत अमान